NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा जोरदार टोला, ६५ वर्षांचे अजितदादा सिनिअर सिटिझन, कधी निवृत्ती घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक विषय

पुणे : NCP MP Supriya Sule | अजितदादांच्या वयाच्या मानाने रोहित पवार (Rohit Pawar) अजून बच्चा आहेच. कारण अजितदादाच आता सिनिअर सिटिझन आहेत. दादा ६५ वर्षांचे आहेत. ते माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठे आहेत. संविधानात वयाची अट नाही. त्यामुळे अजितदादांनी कधी निवृत्ती घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, असा जोरदार टोला खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला आहे. शरद पवार ८४ वर्षांचे होऊनही निवृत्त होत नसल्याबाबतचे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे, यावर सुळे यांनी हे प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, अजित पवार हे रोहित पवारांना सुद्धा बच्चा म्हणाले होते, यावरून देखील सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजितदादा हे काकाच्या अधिकाराने रोहित पवार यांना बच्चा म्हणाले. त्यामुळे तो अधिकार त्यांना आहे. पण रोहितच्या वयात शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ८४ व्या वर्षीही शरद पवार जिद्दीने लढत आहेत. त्यांचा एक उज्वल कार्यकाळ आहे. त्यांच्या करिअर ड्राफ्टवर बोलायला मी खूप लहान आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी राजकारणात आरेला कारे करायला आले नाही.
मी यशवंतराव चव्हाणांच्या कारकिर्दीत वाढलेली एक कार्यकर्ता आहे. आरेला कारे म्हणणे कधीकधी सोपे असते पण
शांत बसून सहन करायला जास्त ताकद लागते. मीही १६ तास काम करते तसेच पारदर्शक काम करते.

पुण्यातील पाणी प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुण्यातील पाणी प्रश्न हा भ्रष्ट जुमला पार्टी, नगरविकास खाते व
सिंचन विभागाने सोडवला पाहिजे, एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी हे केले पाहिजे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Leader Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाणांचे आमदार अपात्रतेवर मोठे भाष्य, पहिला भूकंप नार्वेकरांच्या निर्णयानंतर, पण ते अंग काढून…

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला, ‘खोट्याच्या कपाळी गोटा’ हे येत्या निवडणुकीत कोकणी माणसं खरं करतील

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, वाकड पुलावरील घटना

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

नायजेरियनाकडून अमली पदार्थ आणुन विकणार्‍या दोघांना अटक

Maharashtra Police News | पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केलीय; मग पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हासाठी अर्ज केलात का

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍यांनी दिल्या गुंडाच्या नावाने घोषणा; मामाच्या वादाचा बदल्याबाबत पोलिसांना संशय

Creative Foundation Pune | साधनांची कमतरता नाही गरज संस्कारक्षम पिढी घडविण्याची – चंद्रकांत पाटील

Pune Police Mcoca Action | मुंढवा परिसरात दहशत पसरवणाऱ्या सुमित उर्फ लखन गौड टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 112 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

भांडण सोडवणाऱ्या तरुणाला काचेच्या बाटलीने मारहाण, तिघांवर FIR; हिंजवडी मधील घटना