Pune Pimpri Chinchwad Crime News | गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या भामट्याला गुजरातमधून अटक, चिखली पोलिसांनी 15 लाख 40 हजार केले परत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share Market Investment) केल्यास मोठा फायदा होईल असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 15 लाख 47 हजार 259 रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार मे 2023 मध्ये चिखली पोलीस ठाण्याच्या (Chikhli Police Station) हद्दीत घडला होता. फसवणूक करणाऱ्या आरोपीला चिखली पोलिसांनी गुजरात राज्यातून अटक केली आहे. पोलिसांनी फसवणूक झालेल्या व्यक्तीला 15 लाख 40 हजार रुपये परत केले आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

दिनेशजी पथुजी ठाकोर (वय-26 रा. मु.पो. छबलिया, ता. वडनगर जि. मेहसान, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्य़ादी यांनी सुरुवातीला 50 हजार रुपये गुंतवणूक केली. त्याच्या मोबदल्यात त्यांना सव्वा लाखाचा नफा झाल्याचे दाखवून पुन्हा गुंतवणूक करण्यास सांगितली. तसेच डिमॅट अकाउंट काढून देण्याचे आश्वासन दिले.

तसेच चेतन पटेल व संजय पटेल यांच्या मार्फत ट्रेडींग करा असे सांगून फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यानंतर आरोपीने तुमचा तोटा झाल आहे, तुम्ही पैसे भरा. पैसे भरले नाही तर पोलीस केस होईल अशी धमकी देऊन फिर्य़ादी यांच्याकडून 15 लाख 47 हजार रुपये घेतले. दरम्यान, फिर्यादी यांनी खात्री केल्यानंतर त्यांच्या नावाने डिमॅट खातेच नसल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता आरोपी गुजरात राज्यातील वडनगर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
मात्र, आरोपीने फोन बंद केल्यामुळे व तो व्हॉट्सअॅवर संपर्क करत असल्याने त्याचे लोकेशन सुरत, अहमदाबाद,
गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी येत होते. दरम्यान, आरोपी त्याच्या मुळगावी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांच्या पथकाने आरोपीला त्याच्या मुळ गावातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता फसवणूक केलेली रक्कम नातेवाईकांकडे ठेवल्याचे सांगितले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीच्या नातेवाईकांनी पैसे परत करण्याचे कबूल केले. त्यानुसार नातेवाईकांनी फिर्यादी यांना 15 लाख 40 हजार रुपये परत केले. पैसे परत मिळाल्याने फिर्यादी यांनी चिखली पोलिसांचे आभार मानले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोगले, पोलीस अंमलदार गोडांबे, मोहिते यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना महाळुंगे पोलिसांकडून अटक, एक किलो सोने जप्त

Sharad Mohol Murder Case | …तर शरद मोहोळचा ‘गेम’ झाला नसता, कटात सामील न झाल्याने पोळेकरकडून भूगावमध्ये एकावर गोळीबार

Dr Sanjeev Thakur | ललित पाटील प्रकरण : ससून रूग्णालयाचे तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्याविरुद्ध पोलिसांना पुरावे मिळाले, अटक होणार?

Eknath Shinde Group | शिंदे गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य, ”ठाकरे गट पुन्हा फुटणार, १४ तारखेला काय होतंय पहा…”

Uddhav Thackeray | घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान, पंतप्रधानांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ”गद्दारांची घराणेशाही प्राणप्रिय…”

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळच्या खूनासाठी मदत करणाऱ्या आणखी तिघांना अटक