Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : खोटी बिले देऊन कंपनीला 24 लाखांचा गंडा, दोन कर्मचाऱ्यांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | अकाउंट विभागात काम करणाऱ्या दोघांनी कंपनीच्या बँक खात्यातून स्वत:च्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करुन 24 लाख 30 हजार 828 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 1 एप्रिल 2022 ते 17 एप्रिल 2023 या कालावधीत निगडी येथील जीमजो इंटरनॅशनल अकॅडमी व इंटरनॅशनल फिल्म अकॅडमी येथे घडला आहे. (Cheating Fraud Case)

याबाबत महिलेने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश उर्फ मयुर धावडे (वय-34 रा. एक्सबिया आयफेल, चाकण) आणि एका महिला यांच्याविरोधात आयपीसी 408, 409, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या कंपनीत अकाउंड विभागात काम करत होते. गणेश याच्याकडे कंपनीच्या संपूर्ण अकाउंट विभागाची जबाबदारी होती. तर आरोपी महिलेकडे भेळ चौकात असलेल्या इंटरनॅशनल फिल्म अकॅडमी आणि एव्हिएशन अकॅडमी या नवीन प्रोजेक्टसाठी रोज होणारा जमा खर्च बघण्याची जबाबदारी होती.

दोघांनी कंपनीच्या कॅनरा बँकेच्या चालू खात्यामधून वेळोवेळी धावडे याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करून खोटी बिले कंपनीला सादर केली. आरोपींनी फिर्य़ादी व कंपनीचा विश्वासघात करुन 24 लाख 30 हजार 828 रुपये काढून घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी : दिल्ली विमानतळावर आलेले गिफ्ट सोडवण्याच्या बहाण्याने 23 लाखांची फसवणूक