Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : धुळ्यातून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला गुन्हे शाखेकडून अटक, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | धुळ्यात पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून चार लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.12) वल्लभनगर एस.टी. स्टँड येथे करण्यात आली. तसेच वाकड येथे केलेल्या कारवाईत चार महिलांना अटक केली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

बायला अनसिंग किराडे (वय-40 रा. बोबंले पाडा ता. शिरपुर, जि. धुळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड व मयुर वाडकर यांना माहिती मिळाली की, रात्रीच्या सुमारास धुळे येथुन वल्लभनगर एस.टी. स्टँड येथे गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे. माहिती मिळताच पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 4 लाख 29 हजार 450 रुपये किंमतीचा 8 किलो 569 ग्रॅम गांजा व मोबाईल जप्त केला आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा गांजा पठाण डोंगरसिंग बामणे (रा. बोबंलेपाडा ता. शिरपुर) याच्याकडून आणल्याचे सांगितले. दोनही आरोपींवर पिंपरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दखल केला आहे.

कामगारांना गांजा विकणाऱ्या चार महिलांकडून गांजा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि.13) वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हातोबानगर झोपडपट्टी येथे
मजुरांना गांजा विक्री करणाऱ्या चार महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख 1 हजार 500 रुपये किंमतीचा 1 किलो 430 ग्रॅम वजनाचा गांजा दोन मोबाईल जप्त केला आहे. याप्रकरणी मोनिका राजेंद्र वाडघरे (वय-27 रा. वाकड रोड, वाकड), हर्षदा कृष्णा राऊत (वय-23 रा. म्हातोबा नगर, वाकड), गिता मुकेश यादव (वय-35 रा. कृष्णा स्विट होम समोर, वाकड), माला अनिल गुंजाळ (वय-38 रा. वाकड रोड, वाकड) यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे,
सहायक पोलीस निरीक्षक समीर वाघ, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस उपनिरीक्षक राजन महाडीक व
पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड, मयुर वाडकर, संतोष दिघे, मनोज राठोड, विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, प्रदीप शेलार,
मितेश यादव, अशोक गारगोट व पांडुरंग फुदे, सायबर सेल कडील महिला सहायक पोलीस निरीक्षक सिमा मुंढे,
महिला पोलीस अंमलदार जयश्री माळी, मोनिका चित्तेवार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल फिमध्ये अपहार, डी.वाय.पाटील कॉलेजच्या कर्मचाऱ्यावर FIR

Supriya Sule On Paytm Scam | देशातील दुसरा सर्वांत मोठा भ्रष्टाचार पेटीएममध्ये, सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, निवडणूक रोख्यांच्या तपासाची केली मागणी

पिंपरी : महिंद्रा कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक

Pune Crime News | पुणे: कॉलेज तरुणाला गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ! पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी; पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर FIR