Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : TVS कंपनीतून 10 लाखांचा माल चोरण्याचा प्रयत्न, सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे प्लॅन फसला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | कंपनीतून 10 लाख 42 हजार रुपयांचा माल चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरट्याचा प्लॅन फसला. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी (Talegaon MIDC) पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि. 14) मध्यरात्री मावळ तालुक्यातील मिंडेवाडी (Mindewadi) गावच्या हद्दीतील टीव्हीएस कंपनीत (TVS Company) घडली.(Pune Pimpri Chinchwad Crime)

याप्रकरणी अमोल भालेराव (रा. मिंडेवाडी, ता. मावळ) याच्यावर आयपीसी 380, 511 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कमलेश अनिलराव पाटील (वय 34, रा. पुनावळे) यांनी सोमवारी (दि. 15) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल भालेराव याने टीव्हीएस कंपनीच्या डॉक नं. 17 येथे लावलेल्या एका ट्रक मध्ये 10 लाख 42 हजार 720 रुपये किमतीचा माल चोरून भरला. आरोपीने फिनोलेक्स कंपनीचे बॉक्स चोरून ट्रक मध्ये भरुन ट्रक पार्किंग मध्ये लावला. त्यानंतर ट्रक चालकाला फोन करून ट्रक बाहेर घेऊन येण्यास सांगितले. चालक ट्रक बाहेर घेऊन येत असताना गेटवर ट्रक सुरक्षा रक्षकांकडून अडवण्यात आला.

तिथे सुरक्षारक्षकांनी संतोष साळवी याच्याकडे चौकशी केली असता त्याने ट्रक मधील मालाबाबत काहीही माहिती नसल्याचे
सांगितले. त्यानंतर कंपनीतील प्रतिनिधींनी सीसीटीव्ही तपासले असता हा माल अमोल भालेराव याने चोरून ट्रकमध्ये
भरला असल्याचे समोर आले. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Accident News | पिंपरी : ओव्हरटेक करताना भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक

Baramati Lok Sabha | बारामतीत चालंलय काय? अजितदादांच्या पाठोपाठ आता रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Mahavikas Aghadi (MVA) | पुण्यात गुरुवारी मविआची मोठी प्रचारसभा, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे भरणार उमेदवारी अर्ज