Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बारमध्ये दोन गटात बाचाबाची, भांडण सोडवणाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | बारमध्ये दोन गटात बाचाबाची सुरु असताना भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार हिंजवडी येथील पवेला पब, रेस्टॉरंट आणि बार येथे सोमवारी (दि.25) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याबाबत श्रेयश शरद केदारी (वय-19 रा. लवळे ता. मुळशी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे.

यावरुन ओंकार लालासाहेब काटे (वय-25), रोशन राजेंद्र राणे (वय-23), प्रथमेश लालासाहेब टिपाले (वय-24), अनिकेत जयदेव जाधव (वय-24 सर्व रा. बिजली नगर, चिंचवड) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवेल पब येथे दोन गटात बाचाबाची सुरु असताना फिर्यादी यांनी त्यांना इथे मुली आहेत तुम्ही शांत रहा असे सांगितले. त्यावेळी आरोपी समोरच्या मुलांना मारण्यासाठी अंगावर धाऊन गेली. फिर्य़ादी यांनी त्यांना बाजूला घेतले असता आरोपींनी शिवीगाळ करुन हाताने व पायाने मारहाण केली. तसेच त्याठिकाणी असलेला बांबू डोक्यात मारुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Pune Pimpri Chinchwad Crime)

पिंपरी : खुन्नस देतात म्हणून तरुणाला मारहाण

पिंपरी : खुन्नस देतात म्हणून तीन जणांनी दोन तरुणांना लाथाबुक्क्यांनी व क्रिकेटच्या स्टंपने मारहाण करुन जखमी केले.
हा प्रकार रविवारी (दि.24) रात्री दहाच्या सुमारास दिघी येथील आदर्शनगर येथे घडला.
याबाबत ओमकार नागनाथ धपाटे (वय 20 रा.दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरून बाळा गणेश गगणे (वय 21 रा.दिघी), कुणाल रेकडो (वय 22 रा. दिघी) व अनोळखी इसम यांच्यावर आयपीसी
324,323, 504,506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivajirao Adhalrao Patil Join NCP | शिंदे सेना सोडून आढळराव पाटील राष्ट्रवादीत दाखल, अजित पवारांनी केले स्वागत, आता कोल्हेंविरूद्ध लढणार

Drunk and Drive Action In Pune | पुणे : 142 तळीरामांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणी गुन्हा दाखल, वाहतूक विभागाची कारवाई

Arrest In Vehicle Theft | दुचाकी चोरट्यांना दिघी पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू