Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : हवेत कोयते फरवून वाहनांची तोडफोड, चार जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | हवेत कोयते नाचवत वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवली. तसेच रिक्षा चालकाला कोयता फेकून मारला. या प्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi Police) चार जणांना अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.9) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निगडी येथील अजंठानगर परिसरातील तक्षशिला हौसिंग सोसायटीच्या समोर घडला आहे.

याबाबत बाबासाहेब वैज्यनाथ सरवदे (वय-53 रा. तक्षशिला सोसायटी, अजंठानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गुटल्या उर्फ अनुराग सतीश पाटोळे, विशाल सुरेश शिंदे, प्रफुल्ल त्रंबक गायकवाड, रोहित दत्तात्रय गायकवाड (सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) यांच्यावर आयपीसी 308, 504, 506(2), 427 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपापसात संगनमत करुन हातात कोयते व दांडके घेऊन दहशत पसरवण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या सोसायटीत आले. त्यांनी हातातील कोयते हवेत फिरवून शिवीगाळ केली. तसेच कोणात दम आहे खाली या, तुकडे करतो, आज एकाचातरी मर्डर करत असतो अशी धमकी देवून दहशत पसरवली. तसेच सोसायटीच्या खाली पार्क केलेली फिर्यादी यांची रिक्षा व इतर पाच वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले. तर विशाल शिंदे याने त्याच्या हातातील लोखंडी कोयता फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने फेकून मारला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आजगेकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षांची तोडफोड करुन दोघांवर प्राणघातक हल्ला, खडकी परिसरातील प्रकार; दोघांना अटक