Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : ‘मी आळंदी मधील भाई’ हवेत कोयता फिरवून तडीपार गुन्हेगाराची दहशत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | ‘मी आळंदी मधील भाई आहे’ असे म्हणून हवेत कोयता फिरवून दहशत पसरवणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला (Tadipar Criminal) गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने अटक केली आहे (Pimpri Chinchwad Crime Branch) . ही कारवाई खेड तालुक्यातील केळगाव (Kelgaon Khed) येथे सोमवारी (दि.15) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.(Pune Pimpri Chinchwad Crime)

विनोद संभाजी भिसे (वय-28 रा. हनुमानवाडी, केळगाव) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई सागर बाळासो जैनक (वय-32) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसाह गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट तीन चे पोलीस अधिकारी व कर्मचारी आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते.
त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की, पिंपरी चिंचवड, पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केलेला गुन्हेगार विनोद भिसे याच्याकडे धारदार शस्त्र असून तो केळगाव येथे आला आहे. तसेच हातातील कोयता हवेत फिरवून ‘मी आळंदी मधील भाई आहे’ असे म्हणून लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी असता तो विनापरवानगी शहरात आल्याचे निष्पन्न झाले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 300 रुपये किंमतीचा लोखंडी कोयता जप्त केला.

आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 यांनी पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर व जिल्ह्यातून
18 ऑक्टोबर 2023 रोजी दोन वर्षासाठी तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन आरोपी शहरात आला होता.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Accident News | पिंपरी : ओव्हरटेक करताना भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक

Baramati Lok Sabha | बारामतीत चालंलय काय? अजितदादांच्या पाठोपाठ आता रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Mahavikas Aghadi (MVA) | पुण्यात गुरुवारी मविआची मोठी प्रचारसभा, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे भरणार उमेदवारी अर्ज