Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : तक्रार दिल्याच्या रागातून पालिकेच्या ठेकेदाराला मारहाण; चार जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या कारणावरुन वाद घालून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) ठेकेदाराला शिवीगाळ करुन लोखंडी कटर व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार रविवारी (दि.18) सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास ओटास्किम निगडी येथे घडला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi Police Station) चारजणांना अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

याबाबत नफीस सलीम शेख (वय-42 रा. तथागत हौसींग सोसायटी, ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अरबाज शेख, मुन्ना उर्फ फैयाज शेख, कलवा उर्फ सरफराज शेख व रियाज शेख यांच्यावर आयपीसी 324, 504, 506, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिंपरी चिंचवड मनपा येथे ठेकेदार आहेत. रविवारी सकाळी आरोपींनी फिर्यादी शेख यांच्या घरासमोर आले. आरोपींनी मोठमोठ्याने शिवीगाळ केली. त्यामुळे शेख यांनी घराबाहेर येऊन शिवीगाळ कोणाला करता, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी ‘तुम्ही आमच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात तक्रार का केली?’ असे म्हणून शेख यांच्याशी वाद घातला. त्यांना शिवीगाळ करून दगड, लोखंडी कटर, काठी आणि हाताने मारहाण करुन जखमी केले. शेख यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अमितेश कुमार अ‍ॅक्शन मोडवर! पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर संदर्भात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय (Video)

Pune Crime Branch | पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त (Video)

Namo Chashak 2024 In Pune | नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला (सिलंबम) स्पर्धा संपन्न

50 लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका