Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : इन्स्टाग्रामवरील मित्राला भेटण्यासाठी बोलवून लुटले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | इन्स्टाग्रामवर (Instagram) ओळख झालेल्या तरुणीने भेटण्यास बोलावून घेत तरुणाला दमदाटी करुन त्याचा अॅपल कंपनीचा मोबाईल हिसकावून पळून गेली. हा प्रकार मंगळवारी (दि.27) सकाळी अकराच्या सुमारास पिंपरी येथील समृद्धी हॉटेल येथे घडली आहे. याबाबत तेजसिंग मानसिंग आदियाल (वय-21 रा. जवळकर नगर, पिंपळे सौदागर) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी एका तरुणीवर आयपीसी 392 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेजससिंग हा शिक्षण घेत असून त्याची आणि आरोपी तरुणीची इन्स्टाग्रमवर ओळख झाली. तरुणीने फिर्यादी याला इंन्स्टाग्रामवर मेसेज करुन पिंपरी येथील समृद्धी हॉटेल येथे भेटण्यासाठी बोलवले.(Pune Pimpri Chinchwad Crime)

फिर्यादी तरुणीला भेटण्यासाठी गेले असता तरुणीने त्याच्याकडे मोबाईल फोनची मागणी केली.
त्यावेळी त्याने मोबाईल फोन देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने तरुणीने तु तुझा मोबाईल दे नाहीतर मी आरडाओरडा करुन लोकांना तु माझी छेड काढतो असे सांगेल व माझ्या मित्रांना याठिकाणी बोलवून घेवुन तुला मारण्यास सांगेन अशी धमकी दिली. आरोपी तरुणीने तेजससिंग याच्या पॅन्टच्या खिशातील 45 हजार रुपये किमतीचा आयफोन जबरदस्तीने हात घालून काढून घेत पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डोंब करीत आहेत.

Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा ! नादब्रह्म सर्ववादक, रंगारी रॉयल्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, श्री राम पथक, गरूड स्ट्रायकर्स संघांची विजयी कामगिरी

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : ‘मी इथला भाई आहे’ सुट्ट्या पैशांवरुन रिक्षा चालकाकडून प्रवाशाला दगडाने मारहाण, आरोपी गजाआड

Maharashtra News | काय सांगता ! होय, चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी ! मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जुन्या वादातून तरुणाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण, 6 जणांना अटक