Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भोसरी मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | सोशल मीडियावर ओळख झालेल्या मित्राने लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) जानेवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत कासारवाडी आणि चिंचवड येथे घडला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने सोमवारी (दि.27) भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पृथ्वीराज जाधव Prithviraj Jadhav (वय-20 रा. सोलापूर) याच्यावर 363, 376, पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित 16 वर्षीय मुलीची ओळख सोशल मीडियावर
(Social Media) झाली. यानंतर आरोपीने मुलीची विश्वास संपादन करुन तिला लग्नाचे आमिष दाखवले.
त्याने मुलीला आकुर्डी रेल्वे स्टेशन (Akurdi Railway Station) येथे बोलावून घेतले.
तिला चिंचवड येथे नेऊन तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. यातून पीडित मुलगी दीड महिन्याची गर्भवती राहिली.
पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Sexual assault on a minor girl by luring her into marriage, incident in Bhosari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MC Stan | बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन लवकरच अडकणार लग्नबंधनात

Nandurbar ACB Trap | वाळूचा ट्रक सोडण्यासाठी 70 हजार रुपये लाच घेताना मंडळ अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Hingoli Crime News | वडील रागावल्याने अल्‍पवयीन मुलाकडून जन्मादात्या बापाची हत्या