Pune Pimpri Crime | तपासासाठी बिहार येथून आलेल्या महिला पोलिसाची पुण्यात आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | फसवणुकीच्या (Fraud) गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आलेल्या बिहार पोलीस (Bihar Police) दलातील महिला पोलीस शिपाई कविता कुमारी (Kavita Kumari) यांनी आत्महत्या केल्याची (Suicide) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कविता कुमारी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

महिला पोलीस शिपाई कविता कुमारी (वय-25) या बिहार पोलीस दलातील मुजफ्फरपुर पोलीस ठाण्यात (Muzaffarpur Police Station) कार्यरत होत्या.
पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आयपीसी 420, 406, 34 मधील आरोपीचा तपास करण्यासाठी पुण्यात आल्या होत्या.
त्यांनी आज (गुरुवार) दुपारी दीडच्या सुमारास बावधन (Bawdhan) येथील चांदणी चौकातील हॉटेल विवा इन (Hotel Viva Inn) मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. (Pune Pimpri Crime)

 

कविता कुमारी या विवाहित असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक ओम प्रकाश प्रसाद (PSI Om Prakash Prasad) यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

 

Web Title : –  Pune Pimpri Crime | Female police officer who came from Bihar for investigation committed suicide in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा