Pune Pimpri Crime | महिलेचे फोटो मॉर्फ करुन विनयभंग, 2 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर पिंपरी पोलीस ठाण्यात FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | महिलेच्या फोटोंचे मॉर्फींग (Photo Morphing) करुन ते व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करणाऱ्या दोन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन (Group Admin) विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) 30 ऑगस्ट 2022 ते 15 सप्टेंबर 2022 या कालावधीत राडा नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर (Rada Whatsapp Group) घडला आहे.

याबाबत पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन राडा नावाच्या ग्रुप अ‍ॅडमीन (नाव पत्ता माहित नाही) 9730150644 व दुसरा ग्रुप अ‍ॅडमिन 8308667861 यांच्यावर आयपीसी 354, 500 व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत
(Information Technology Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे राडा या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन आहेत.
आरोपींनी पीडित महिलेचा फोटोमधील चेहऱ्याचा वापर करुन अश्लील व्हिडीओ (Pornographic Video)
तयार केले. आरोपींनी एडिट केलेले व्हिडिओ फिर्यादी यांची बदनामी करण्यासाठी ग्रुपवर शेअर करुन विनयभंग
(Molestation) केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे (PSI Rupali Bobde) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | FIR filed against 2 WhatsApp group admins in Pimpri police station for molesting women by morphing their photos

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Poor Eyesight | चष्मा लावण्याची येणार नाही वेळ, अवलंबा ‘हे’ 5 रामबाण उपाय; अनेक समस्यांपासून मिळेल आराम

CM Eknath Shinde | वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे