Pune Pimpri Crime | पुण्यातील खळबळजनक घटना ! सिगारेट न दिल्याने मित्रांनी केला 15 वर्षाच्या मुलाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | कबुतराच्या ढाबळीवर येऊन गेलेल्या एकाला मारण्याचा कट रचण्यासाठी अल्पवयीन…
Pune Pimpri Crime friends brutally murder 15 year old boy for not giving him cigarettes Pimpri Chinchwad pune crime news
file photo
ADV

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | कबुतराच्या ढाबळीवर येऊन गेलेल्या एकाला मारण्याचा कट रचण्यासाठी अल्पवयीन मित्र एकत्र आले. त्यावेळी दारु पिऊन (Drinking Alcohol) नाचगाणे सुरु असताना एकाने 15 वर्षाच्या मित्राकडे सिगारेटची (Cigarettes) मागणी केली. त्याने सिगारेट देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून (Brutally Murder) केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Pimpri Crime) सोमवारी (दि.4) दुपारी मोशी येथील जुना जकात नाका (Moshi Juna Zakat Naka) येथे घडली.

 

सुमित सतीश बनसोडे Sumit Satish Bansode (वय – 15 रा. बनकरवस्ती, मोशी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर (DCP Manchak Ipper) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुमित याच्या एका मित्राची कबुतराची ढाबळ आहे. त्या ढाबळीत डुडुळगाव येथील एकजण येऊन गेल्याचा संशय सुमित आणि त्यांच्या इतर मित्रांना होता. ज्याच्यावर त्यांचा संशय होता त्याची देखील कबुतरांची ढाबळ होती. संशयावरून त्याला मारण्यासाठी सुमितच्या मित्राने त्याला इंस्टाग्रामवर मेसेज करुन भेटण्यासाठी बोलावून घेतले. तो आल्यानंतर त्याला मारण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने सोमवारी सकाळपासून सुमित आणि त्याचे मित्र एकत्र आणण्यास सुरुवात केली. अकराच्या सुमारास सुमित याच्यासह पाच ते सात मित्र एकत्र आले. ते सर्वजण मोशी येथील जुन्या जकात नाक्याजवळ असलेल्या जंगलात गेले. (Pune Pimpri Crime)

 

जंगलात सर्वांनी दारु पिऊन मोबाईलवर गाणी लावून नाचू लागले. त्यावेळी सुमित कडे सिगारेट होती. त्याच्या एका मित्राने सुमितकडे सिगारेट मागितली. त्याने सिगारेट देण्यास नकार दिल्याने मित्रांनी सुमितच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने सुमितचा जागीच मृत्यू झाला. सुमितचा मृत्यू झाल्याचे समजताच सर्वजण घटनास्थळावरुन पळून गेले.

 

बेपत्ता झाल्याची पोलिसांत नोंद

सुमितची आई एका स्कुलबसवर अटेंडंट म्हणून काम करते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घरी आली असता सुमित घरी नसल्याने त्यांनी त्याचा शोध घेतला. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास सुमितच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (MIDC Bhosari Police Station) धाव घेत सुमित बेपत्ता (Missing) झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत सुमितचा शोध सुरु केला.

 

मित्रामुळेच गुन्हा उघडकीस

ज्यावेळी सुमितचा खून झाला त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेला एक मित्र सोमवारी दिवसभर सुमितच्या आईसोबत होता.
तो सुमितच्या आईसोबत फिरुन त्याचा शोध घेत होता.
मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याने पोलिसांना सुमित जुना जकात नाक्याजवळ झाडाखाली झोपल्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सुमितचा मृतदेह मिळून आला.
पोलिसांना मित्रावर संशय आल्याने त्याच्याकडे सखोल चौकशी केली.
त्यावेळी त्याने पाच ते सहा साथीदारांनी मिळून सुमितचा खून केल्याची माहिती दिली.

 

शाळेच्या दप्तरात हत्यारं

या प्रकरणात ताब्यात घेतलेली दोन मुले शाळेत जातो असे सांगून दप्तर घेऊन घरातून बाहेर पडले.
बाहेर आल्यानंतर त्यांनी दप्तरात कोयते, खंजीर घेतले. तसेच सुमित याने सिगारेट आणि दारु घेतली.
त्यानंतर जंगलात जाऊन दारु पिऊन नाचगाणे केले.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | friends brutally murder 15 year old boy for not giving him cigarettes Pimpri Chinchwad pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Total
0
Shares
Related Posts