Pune Pimpri Crime News | मुंढवा-केशवनगरमधील ज्येष्ठ नागरिकाचा खून करणार्‍या 6 जणांच्या टोळीवर मोक्का, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 31 वी MCOCA कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | मुंढवा-केशवनगर (Mundhwa Keshav Nagar) परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाचा खून (Murder In Pune) केल्याप्रकरणी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी 6 जणांविरूध्द मोक्का कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत 31 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कारवाई केली आहे. (Pune Pimpri Crime News)

 

सागर अशोक जावळे Sagar Ashok Jawle (22), आकाश अशोक जावळे Akash Ashok Jawle (19, दोघे रा. गजानन मंदिर कॉलनी, मांजरी बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे), साहिल भिमाशंकर सुतार Sahil Bhimashankar Sutar (19, रा. चारवाडा, मांजरी ब्रुदुक, ता. हवेली), सनी विनायक चव्हाण Sunny Vinayak Chavan (25, रा. सटवाई मंदिर शेजारी, मांजरी बुद्रुक, ता. हवेली), नागनाथ उर्फ हरी विठ्ठल पाटील Nagnath Alias Hari Vittal Patil (22, रा. गवळीवाडा चारवाडा चौक, मांजरी, हडपसर, पुणे. मुळ रा. कुर्डवाडी, शिवाजी पुतळा, अंबाबाई मंदिराशेजारी, कुर्डवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि रोहित दत्तात्रय घाडगे Rohit Dattatray Ghadge (22, रा. गोसावी वस्ती, भापकर मळा, मांजरी बु. पुणे) यांना खुनप्रकरणी (Murder In Mundhwa) यापुर्वीच अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेवुन निरीक्षण गृहात (Pune Remand Home) ठेवण्यात आलेले आहे. या सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. (Pune Pimpri Crime News)

आरोपी हे दि. 30 एप्रिल 2023 रोजी केशवनगरमधील गायकवाड वस्ती येथील कल्याणी इंजिनिअरिंग कंपनीच्या बाहेरील रोडवर भांडण करत होते. त्यांच्या भांडण सोडविण्यासाठी रविंद्र गायकवाड Ravindra Gaikwad Murder (60) हे गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना दगडाने बेदम मारहाण करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यामध्ये गायकवाड यांचा खून झाला. आरोपींविरूध्द मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये (Mundhwa Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींना अटक केली. आरोपी सागर जावळे हा साथीदारांसह हिंसक मार्गाचा अवलंब करून स्वतःच्या टोळीचे वर्चस्व रहावे म्हणुन परिसरात दशहत निर्माण करीत होता.

 

मुंढवा पोलिस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे (Sr. PI Ajit Lakde) यांनी सागर जावळे आणि त्याच्या इतर साथीदारांवर मोक्का कारवाई व्हावी यासाठी पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांच्या मार्फतीने अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjankumar Sharma) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची छाननी करून सागर जाळवे आणि त्याच्या इतर साथीदारांविरूध्द मोक्का कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत 31 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे. सागर जावळे टोळीविरूध्द कारवाई करण्यात आलेल्या मोक्काचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) करीत आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा,
पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Sr PI Vishnu Tamhane), तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे (PI Pradeep Kakade), पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाड (PSI Balasaheb Gaikwad),
पोलिस अंमलदार हेमंत झुरूंगे, दिपक कांबळे, रविंद्र देवढे यांनी ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  Pune Pimpri Crime News | Mundhwa-Keshavnagar Murder Case MCOCA Mokka Action
On Sagar Jawle Akash Jawle And Others

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा