Pune Pimpri Crime News | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या दोन तरुणांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या दोन तरुणांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई महाळुंगे आणि निगडी पोलीस ठाण्याच्या (Nigdi Police Station) हद्दीत मंगळवारी (दि.20) करण्यात आली. आरोपींकडून 35 जार रुपये किंमतीचे दोन पिस्टल जप्त (Unlicensed Pistol Seized) करुन स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

सागर हरिनारायण कडु (वय-28 रा. महाळुंगे, मुळ रा. तेलारा जि. अकोला) याला महाळुंगे पोलिसांनी (Mahalunge Police Station) अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश राजेंद्र गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई महाळुंगे ते आंबेठागण रोडलगत असलेल्या मोकळ्या जागेत केली. आरोपीकडून दहा हजार रुपये किंमतीचा एक देशी बनवाटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थेऊरकर करीत आहेत.

दुसरी कारवाई गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने निगडी येथील ट्रान्सपोर्टनगर येथे केली.
ट्रान्सपोर्टनगर येथील हॉटेल सर्जा येथे एक तरुण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून सुवेंद्र राकेश चौधरी (वय-18 रा. कान्हा फाटा, ता. मावळ) याला ताब्यात घेऊन
अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे 25 हजार रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्टल आढळून आले.
याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश केकणे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीवर आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Hadapsar Crime | पुणे : कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर विनयभंगाचा गुन्हा

Shivsena Shinde Group | महायुतीत जागावाटपावरून मीठाचा पहिला खडा पडला, शिंदे गटाचा नेता म्हणाला, ”शिवसेना भाजपाच्या दावणीला…”

Pune Yerawada Crime | मुलींमध्ये नाचल्याच्या कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, येरवडा परिसरातील घटना