Pune Pimpri Crime News | धक्कादायक ! धंद्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न, 14 जणांवर FIR; आळंदी परिसरातील घटना

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | पुणे जिल्ह्यातील आळंदी (Alandi) परिसरात धर्मांतरासाठी (Conversion) जबरदस्ती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी येशूचे रक्त (Blood of Jesus) म्हणून सरबत पाजून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर रविवारी (दि.15) धंद्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवून धर्मांतर करुन घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) 14 जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime News) खेड तालुक्यातील मरकळ येथे रविवारी (दि.15) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला आहे.

याबाबत प्रसाद भाऊसाहेब साळुंके (वय-25 रा. मरकळ, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रदिप मधुकर वाघमारे, प्रशांत मधुकर वाघमारे (वय-30 दोघे रा. चऱ्होली), रोनक शैलेश शिंदे (वय-18 रा. भोसरी), तेजस प्रकाश चांदणे (वय-32 रा. गव्हाणे वस्ती, भोसरी), अशोक मुकेश पांढरे (वय-19 रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), मुकेश जयकुमार विश्वकर्मा (वय-25 रा. भोसरी), लक्ष्मण श्रीरंग नायडु (वय-35 रा. ममता स्वीट चौक, भोसरी), म्युंगी ब्युयुंग युन (वय-38 रा. पांजरपोळ, भोसरी), ज्युईल वोमन युन (वय-36 रा. भोसरी), ईशा भाऊसाहेब साळवे (वय-19 रा. भोसरी), 33, 18, 24 वर्षीय महिला आणि 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आयपीसी 153 (अ), 298, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा मरकळ येथे सलुन व्यवसाय आहे.
रविवारी सकाळी आरोपींनी फिर्य़ादी यांच्या गावातील लोकांच्या घरासमोर जावून तुम्ही बायबल (Bible) वाचता का?
चर्च मध्ये या तुमच्या धंद्याला आम्ही आर्थिक मदत करु असे आमिष दाखवले.
तसेच दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा आणि धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला.
पुढील तपास पोलीस हवालदार लोणकर करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime News | Shocking! Attempted conversion by luring financial help for business, FIR against 14; Incidents in Alandi area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hardeek Joshi | राणादाने सांगितलं सिनेसृष्टीत पदार्पण करण्यामागचे कारण; म्हणाला…

Pune Crime News | तूझा माज उतरवतो म्हणत टोळक्याने केला रिक्षाचालकावर कोयत्याने वार; लोहियानगरमधील घटनेत तिघांना अटक