Pune Pimpri Crime News | तळेगाव दाभाडे : सुरक्षा रक्षकाला कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साईटवर चोरी, एकाला अटक

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | बांधकाम साईटवर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला (Security Guard) कोयत्याचा धाक दाखवून लोखंडी सळ्या चोरुन नेणाऱ्या चोरट्याला तळेगाव दाभाडे पोलिसांनी (Pimpri Police) अटक केली आहे. हा प्रकार तळेगाव स्टेशन परिसरातील सिटी पॅलेजा बांधकाम साईटवर रविवारी (दि.26) मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास घडला. (Pune Pimpri Crime News)

याप्रकरणी चंद्रबहादुर तिलक दमाई (वय-48 रा. सॅमसंग नगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संदीप गोविंद राठोड Sandeep Govind Rathore (वय-24 रा. डांगे चौक, गणेश नगर वाकड) व इतर तीन जणांवर आयपीसी 392, 506, 34 सह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन संदीप राठोड याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे तळेगाव स्टेशन परिसरातील महाराष्ट्र बँकेच्या शेजारी सुरू असलेल्या
सिटी पॅलेजा नावाच्या बांधकाम साईट जवळील लेबर रुममध्ये झोपले होते. रविवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास
त्यांना आवाजाने जाग आली. त्यांनी दरवाजा उघडला असता आरोपीने कोयता दाखवून शांत राहण्यास सांगून
जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिली. (Pune Pimpri Crime News)

आरोपी संदीप राठोड व त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादी यांच्यासमोर बांधकाम साईटवरुन 47 हजार 600 रुपयांच्या
लोखंडी सळ्या टेम्पोमध्ये टाकून चोरुन नेल्या. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी तात्काळ परिसरातील
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे राठोड याला अटक केली. मात्र, त्याचे इतर तीन साथीदार पळून गेले असून
पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे (PSI Jagdale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | नातेवाईकांच्या नावाने फर्म बनवून इंनटेक्स कंपनीला 2 कोटींचा गंडा; पिंपरी चिंचवड परिसरातील प्रकार; 22 वर्षीय तरुणीसह परराज्यातील चौघांवर FIR

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर, छगन भुजबळांसारख्या…