Pune Pimpri Crime News | फ्लिपकार्ट हब मधुन मोबाईल चोरणाऱ्या दोन डिलीव्हरी बॉयला वाकड पोलिसांकडून अटक, 6 लाखांचे 24 मोबाईल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | ग्राहकांनी ऑनलाईन मागवलेले 9 लाख 47 हजार 160 रुपये किंमतीचे 38 मोबाईल फोन कुरिअर कंपनीच्या (Courier Company) कार्यालयात काम करणाऱ्या कामगार व त्याच्या इतर अल्पवयीन साथीदारांनी चोरुन नेल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. या गुन्ह्यातील आरोपींना वाकड पोलिसांनी (Pimpri Police) अटक करुन 5 लाख 91 हजार 244 रुपयांचे 24 मोबाईल जप्त केले आहेत. (Pune Pimpri Crime News)

कुरिअर कंपनीच्या कार्यालयात काम करणारा कामगार आशिष भाऊसाहेब भोसले Ashish Bhausaheb Bhosale (वय-22 रा. पिंपरी, पुणे) याला यापूर्वीच अटक करुन अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) आयपीसी 381, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 27 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला इन्स्टाकार्ट सर्विस (Instacart service) या ऑनलाईन कुरिअर कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या कंपनीत आरोपी आशिष भोसले हा काम करत होता. ऑक्टोबर महिन्यात सुरु झालेल्या ‘बिग बिलियन डे’ निमित्त अनेकांनी ऑनलाईन मोबाईल फोनची खरेदी केली होती. त्यामुळे फिर्यादी यांच्या कंपनीवर ताण वाढला होता. याचा गैरफायदा घेऊन आरोपी आशिष भोसले आणि त्याच्या इतर साथीदारांनी कंपनीच्या कार्यालयातून 9 लाख 47 हजार 160 रुपये किंमतीचे 38 मोबाईल फोन चोरुन नेले. हा प्रकार लक्षात येताच महिलेने वाकड पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपास करुन एका आरोपीला अटक करुन अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेऊन 8 मोबाईल जप्त केले. (Pune Pimpri Crime News)

आरोपींची पोलीस कस्टडी घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता पियुष गोविंद मोहिते
(वय-23 रा. नेवाळे वस्ती, चिखली) याने नाव निष्पन्न झाले. त्यानुसार तपास पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला
अटक केली. आरोपींकडे एकत्रित चौकशी करुन सर्व आरोपींकडून 5 लाख 91 हजार 244 रुपये किंमतीचे विविध कंपनीचे
24 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित मोबाईलचा पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinay Kumar Choubey), सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे
(IPS Dr. Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग डॉ. विशाल हिरे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे विठ्ठल साळुंखे,
सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक पोलीस फौजदार बिभीषण कन्हेरकर,
बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार संदीप गवारी, स्वप्निल खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम,
वंदु गिरे, प्रशांत गिलबीले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे,
सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडीत यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : मेडिकल प्रवेशाच्या आमिषाने 27 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

Manoj Jarange Patil | सरकारकडे जरांगेंची मागणी, जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा

Pune Crime News | प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरूणीची आत्महत्या, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News | पुणे : ‘मोठ मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना ओळखतो’ म्हणत महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, विनयभंग करणाऱ्या दोघांवर FIR