Pune Pimpri News | शिवजयंती निमित्त ‘शिवतांडव’ या ऐतिहासिक नाटकाचा शुभारंभ; तब्बल 37 कलावंत 9 गाण्यांचा समावेश असलेले भव्यदिव्य नाटक, भाऊसाहेब भोईर यांच्या मोरया थिएटर्सची निर्मिती

पुणे/ पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri News | भगव्या ध्वजाने नटलेला प्रा . रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचा परिसर, नाट्य रसिकांच्या स्वागताला सनई चौघडे, तुतारी अशा प्रकारच्या मंगलमय वातावरणात शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘ शिवतांडव’ या भव्य नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मोरया गोसावी गणेशाच्या आणि पिंपरी चिंचवडकरांच्या साक्षीने मोठ्या दिमाखात पार पडला. पहिल्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘ शिवतांडव’ या नाटकातून महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास मराठी रंगमंचावर उलगडणार आहे. भाऊसाहेब भोईर यांच्या मोरया थिएटर्सने या भव्यदिव्य नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकाचे दिग्दर्शक दिलीप भोसले असुन ज्येष्ठ लेखक प्रताप गंगावणे यांनी नाटकाचे लेखन केले, रोहित नागभिडे यांचे संगीत आहे. नेपथ्य बाबा पार्सेकर यांचे असून सूत्रधार राजु बंग,भैरवनाथ शेरखाने आहेत. तर सुप्रसिद्ध अभिनेता शंतनु मोघे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत, तसेच नाटकात तब्बल ३७ कलावंत आहेत, यामध्ये ९ गाणी असून प्रत्येक गाणे हे कथेला पुढे घेऊन जाणारे आहे. या नाटकाचे शीर्षक गीत मानसी धुले – भोईर यांनी गायले आहे. कव्वाली, लावणी, भजन अशी वैविध्यपूर्ण गाणी यात आहेत तसेच एक रॅप साँग देखील प्रेक्षकांना ऐकायला मिळते. भव्य नेपथ्य, उत्तम संगीत, काळजाचा ठाव घेणारी गाणी आणि दमदार संवाद या नाटकाच्या जमेच्या बाजू आहेत.

याप्रसंगी बोलताना नाटकाचे निर्माते भाऊसाहेब भोईर म्हणाले, चित्रपट, नाटकाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा मोरया थिएटर्सचा नेहमी प्रयत्न असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आजच्या पिढीला दाखवण्यासाठी आम्ही ‘शिवतांडव’ ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. ७ महिन्या पासून नाटकाची तयारी सुरू आहे. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगा आधीच राज्याच्या विविध भागातून प्रयोगासाठी विचारणा होत आहे. आज हे नाटक बंदिस्त नाट्यगृहात सादर केले जात असले तरी या नाटकाचे प्रयोग खुल्या मैदानात महानाट्य म्हणून देखील आम्ही करू शकतो त्यासाठी नेपथ्य, प्रकाश योजना वेगळी असेल तसेच त्यामध्ये ७० हून अधिक कलावंत असतील असेही भोईर यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Nilesh Lanke | नगरमध्ये राजकीय हालचालींना वेग, निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, बोलावली तातडीची सभा

Pune Court News | पुणे : पार्किंगच्या वादातून खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन मंजूर

Mumbai To Pune Cabs | मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार, जाणून घ्या नवे दर

Vasant More-Prakash Ambedkar | वसंत मोरे उमेदवारीसाठी आता प्रकाश आंबेडकरांना भेटणार? जरांगे-आंबेडकर-शेंडगे समीकरणातून ठरू शकतात ‘गेम चेंजर’

Bachchu Kadu Targets Navneet Rana | बच्चू कडू वर्ध्यातून निवडणूक लढवणार? ३०० कार्यकर्त्यांनी रक्तदानाद्वारे केली मागणी, नवनीत राणांबद्दल म्हणाले…

Pune Kothrud Crime | पुणे : कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी, आयटी इंजिनिअरवर गुन्हा दाखल