Pune Pimrpi Crime | पिंपरी : बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करणाऱ्या तरुणावर गुन्हे शाखेकडून कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून लहान गॅस सिलेंडर मध्ये पिनच्या सहाय्याने बेकायदेशिर रिफिलिंग (Illegal Gas Refilling) करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (PCPC Crime Branch) दरोडा विरोधी पथकाने शनिवारी (दि.24) सायंकाळी सातच्या सुमारास हिंजवडी फेज -2 येथील मोकळ्या जागेत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये केली. (Pune Pimrpi Crime)

याबाबत पोलीस हवालदार उमेश मधुकर पुलगम यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सचिन बिरा मेटकरी (वय-24 रा. बोकडेवाडी, हिंजवडी फेज -2) याच्यावर आयपीसी 285, 286 सह जिवनावश्यक वस्तुंचा कायदा 1955 चे कलम 3, 7 सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन 1908 चे कलम 5 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी हिंजवडी परिसरात पेट्रोलिंग करत असताना फेज दोन येथे असलेल्या
मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री केली
जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.
त्यावेळी आरोपी घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधून पिनच्या सहाय्याने गॅस अवैधरित्या दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरताना आढळून आला.

आरोपी बेकायदेशीररित्या कोणत्याही परवानगी शिवाय व कोणत्याही सुरक्षितते शिवाय भरलेल्या सिलेंडर मधील
गॅस रिकाम्या गॅस टाकीमध्ये भरत होता. यावेळी जिवीतास धोका होण्याची शक्यता असताना देखील आरोपी हा
बेकायदेशीर कृत्य करत असताना आढळून आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी : बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड पोलिसांकडून अटक

Pune Cheating Fraud Crime | मोठी ऑर्डर देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक, आरोपीला कर्नाटकातून अटक; वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी