Pune Cheating Fraud Crime | मोठी ऑर्डर देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक, आरोपीला कर्नाटकातून अटक; वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कंपनीची मिळालेली मोठी ऑर्डर देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक (Pune Cheating Fraud Crime) केल्या प्रकरणी बारामती येथील दोघांवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीला कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथून अटक केली आहे. हा प्रकार मार्च 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी दामोदर श्रीपती पवार व त्याचा मुलगा गणेश दामोदर पवार (दोघे रा. बालाजी निवास, गुरुकुल हौसिंग सोसायटी, भिगवण रोड, बारामती) यांच्यावर आयपीसी 420, 406, 465, 467, 468, 471, 472, 34 नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गणेश पवार याला कलबुर्गी येथून अटक केली आहे.(Pune Cheating Fraud Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा बांधकाम व्यवसायाकरिता लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मशिनरी विक्री
व दुरुस्ती करण्याचा भागिदारीत व्यवसाय आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून एक मिनी कॉम्पॅक्टर मशीन खरेदी करुन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एका कंपनीची मोठी ऑर्डर मिळाल्याचे भासवून कंपनीचे बनावट सही शिक्का असलेली ऑर्डर फिर्य़ादी यांना दाखवली. तसेच ही ऑर्डर फिर्यादी यांना देण्याचे आश्वासन देवून त्याबदल्यात वेळेवेळी आर.टी.जी.एस द्वारे 57 लाख 83 हजार 500 रुपये घेतले. आरोपींनी ऑर्डर दिली नसल्याने फिर्यादी यांनी दिलेले पैसे मागितले असता आरोपींनी 18 लाख रुपये परत केले. मात्र, घेतलेल्या एकूण रक्कमेपैकी 39 लाख 83 हजार 500 रुपये परत न करता रकमेचा अपहार केला. तसेच फिर्यादी यांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक केली.

दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश पवार (वय-40) हा ओळख लपवून कर्नाटकातील कलबुर्गी या ठिकाणी
राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी निष्पन्न झाल्याने तपास पथक
कलबुर्गी येथे रवाना करण्यात आले. तपास पथकाने गणेश पवार याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3
संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते, पोलीस अंमलदार फड, गुजर, हंडाळे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Accident | पिंपरी चिंचवडमध्ये तीन अपघातांच्या घटना; तीन ठार

Pune Mundhwa Police | घराची वाट चुकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची मुंढवा पोलिसांनी घडवली कुटूंबियांची भेट

पुणे : जुन्या वादातून अल्पवयीन मुलाला धारदार हत्याराने मारहाण, चार जणांवर FIR

Pune Murder Suicide Case | पुणे : पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या; खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या ‘पिकॉक बे’ परिसरातील घटना

जेवण वाढताना पती-पत्नीमध्ये वाद, पत्नीकडून पतीवर चाकूने वार; भवानी पेठेतील घटना

Pune Pashan-Sus Road Accident | पाषाण-सूस रोडवर अपघात, संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू