Pune PMC News | राजकिय पुढार्‍यांचे ‘लाड’ पुरविण्याच्या हट्टामुळे महापालिकेच्या २०० सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबांवर बेरोजगारीची कुर्‍हाड !

पुणे – Pune PMC News | महापालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षकांमध्येच मोठ्याप्रमाणावर अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे. विशेष असे की, एका राजकिय पुढार्‍यांचे ‘लाड’ पुरविण्याच्या हट्टामुळे केवळ याच नोकरीवर उदरनिर्वाह करणार्‍या दोनशेहून अधिक सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या कुटुंबांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची भिती हे सुरक्षा रक्षक व्यक्त करत आहेत. (Pune PMC News)

महापालिकेने दोन वर्षांपुर्वी महापालिकेला १,५८० कंत्राटी सुरक्षा रक्षक पुरविण्याची निविदा काढली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक पुरविण्याची अट असल्याने यामध्ये ठराविक कंपन्याच पात्र ठरू शकतील, अशी त्यापुर्वी महापालिकेला सुरक्षा रक्षक पुरवणार्‍या ठेकेदारांनी तक्रार केली होती. पुर्वी दोन, तीन ठेकेदारांकडून सुरक्षा रक्षक पुरविण्यात येत असत. मात्र, यानंतरही महापालिकेने एकच निविदा काढून यामध्ये सर्वात कमी दराची निविदा असलेल्या क्रिस्टल कंपनीला हे काम देण्यात आले. ही कंपनी एका राजकिय पुढार्‍याची असल्याची माहीती आहे. (Pune PMC News)

दरम्यान, या कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना कधी वेळेवर वेतन देण्यात आले नाही, तसेच पीएफ देखिल भरण्यात आला नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले. यामुळे प्रशासनाच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. प्रशासनाने पुढीलवर्षीसाठी मनुष्यबळ पुरविण्यासाठी दोन स्वतंत्र निविदा काढल्या. ऑक्टोबरमध्ये या निविदा उघडण्यात आल्या.

सुरक्षा रक्षक पुरविणार्‍या या नवीन कंपन्यांनी जुन्या कर्मचार्‍यांमधील ४५ वर्षावरील कर्मचारी, पुरेेसे शिक्षण नसलेले
सुमारे ३०० हून अधिक कर्मचारी कमी केले. यावरून कर्मचार्‍यांमध्ये असंतोष पसरला.
काढून टाकण्यात आलेल्या कर्मचार्‍यांनी आंदोलनही केले.
या कर्मचार्‍यांना कामावर परत घ्यावे, यासाठी काही पुढार्‍यांनी प्रशासनाकडे तगादा लावला.
त्यामुळे नवीन ठेकेदार कंपन्यांनी तशी तयारी दर्शविली. परंतू ही तयारी दर्शविताना संबधित कर्मचार्‍यांकडे महापालिकेकडे मागील पाच वर्षे काम करत असल्याचे कागदोपत्री पुरावे मागितले.
काढून टाकण्यात आलेल्या ३०० पैकी जेमतेम १५० जणच योग्य ते पुरावे देउ शकले.
कागदपत्र तपासणी दरम्यान क्रिस्टल कंपनीचे मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये कामाची मुदत संपत असताना सुमारे १५० ते २०० जणांना ऑर्डर्स वाटल्याचेही संबधित कंपन्यांच्या निदर्शनास आले.
मागील पाच वर्षांचे पुरावे दाखल करताना काही मंडळींनी वेतन जमा होणार्‍या बँकेच्या पासबुकमधील नाव व
खाते क्रमांकाची नोंद असलेल्या पहिल्या पानाची झेरॉक्स व जुन्या कामगारांच्या पासबुकच्या प्रत्यक्षात बँक
एन्ट्रीजच्या पानांच्या झेरॉक्स जोडल्याचे निदर्शनास आल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली.

दरम्यान,काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर घेण्याच्या निर्णयामुळे नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या
सुमारे १५० कंत्राटी सुरक्षकांना कमी करावे लागणार आहे. सुमारे ३०० नवीन सुरक्षा रक्षक घेण्यात आले आहेत.
यापैकी कोणत्या १५० रक्षकांना काढायचे, याचा देखिल पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.
ज्यांना कामावरून केले जाईल त्यांचा रोष पालिका प्रशासनाला भोगावा लागणार आहे.
केवळ ‘क्रिस्टल’ कंपनीला काम देण्याचा अट्टाहास, या कंपनीने जाता जाता दिलेल्या १५० ते २०० बोगस ऑर्डर्स
यामुळे मोठा घोटाळा झाला असून पालिकेची सुरक्षा अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.

Web Title :- Pune PMC News | 200 security guards of the pune municipal corporation and their families due to the insistence of providing ‘pampering’ to the political leaders!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik ACB Trap | 40 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा लिपिक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | विमानाने पुण्यात येऊन महागडे फोन चोरणारी आंतरराज्यीय टोळी विमानतळ पोलिसांकडून गजाआड, 30 लाखांचे मोबाईल जप्त

Aaditya Thackeray | सहा महिन्यात बारावे कारण दिलंय, तरीही ते गद्दारच!, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला