Pune PMC News | स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आणि ब्युटी पार्लरच्या जाहिरातीच करत आहेत शहर विद्रुपीकरण ! कसबा – विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाचा १२ संस्थांना झटका; पोलिसांत गुन्हे दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | जी २० परिषदेच्या निमित्ताने येणार्‍या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सार्वजनिक स्वच्छतेसाठी प्रशासन आहोरात्र झटत आहे. मात्र, नागरीकच त्या ‘स्वच्छतेवर’ पिचकार्‍या मारत आहेत. गुटखा, तंबाखू खाणारे नशेडी हे यामध्ये अगे्रेसर असले तरी सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स चिटकवणारे ‘ब्युटीपार्लर’ व्यावसायीक आणि अधिकार्‍यांच्या भावी पिढ्या घडवणार्‍या ‘स्पर्धा परीक्षा अभ्यासिका’ देखिल यामध्ये मागे नाहीत. महापालिकेच्या कसबा- विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाने याविरोधात कडक भूमिका घेतली असून सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स चिटकवणार्‍या या संस्थांविरोधात थेट पोलिसांत गुन्हेच दाखल करत चांगलाच झटका दिला आहे. (Pune PMC News)

 

जी २० परिषदेच्या निमित्ताने शहरातील पदपथ, डिव्हायडर, चौकांमध्ये सुशोभीकरण सुरू आहे. सार्वजनिक भिंतींवरही पेटींग काढण्यात येत आहेत. यासाठी मागील महिन्याभरापासून महापालिका प्रशासन काम करत आहे. परंतू यानंतरही दुभाजकांना पेटींग केल्यानंतर काही तासांतच त्यावर गुटखा आणि पानाच्या पिचकार्‍या टाकून कामावर पाणी फेरले जात आहे. तसेच व्यावसायाची जाहिरात करणार्‍यांकडून सार्वजनिक भिंती, झाडे, दिशा दर्शक फलक, वीजेचे डी.पी., स्वच्छतागृहांवर पोस्टर्स चिटकवून विद्रुपीकरण करण्यात येत आहे. महापालिकेने मागील वर्षभरात शहरातील ५५ हजारांहून अधिक अनधिकृत बोर्ड बॅनर काढले आहेत. तसेच अनेकांना नोटीसेस बजावल्या आहेत. या कामासाठी महापालिका दरमहा एक ते सव्वाकोटी रुपये खर्च करत आहे. परंतू यानंतरही विद्रुपीकरणाचे काम जोमात सुरू आहे. या विद्रुपीकरणाला ब्रेक लावण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. (Pune PMC News)

 

महापालिकेच्या कसबा- विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाच्यावतीने शहरातील मध्यवर्ती लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता,
बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता आणि शास्त्री रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स चिटकवणार्‍यांविरोधात पोलिस कारवाई सुरू केली आहे.
यामध्ये प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांच्या क्लास चालक, ब्युटी पार्लर व्यावसायीक आणि जागा खरेदी विक्री करणारे व्यावसायीक आढळून आले आहेत. उपायुक्त अविनाश संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे दत्तवाडी आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त आशिष म्हाडदळकर यांनी दिली.

महापालिकेने गुन्हे दाखल केलेल्या व्यावसायीकांची यादी
* फेबिना इंटरनॅशनल सलोन ऍन्ड ऍकॅडमी * सोने तारण कर्ज * ज्ञानज्योती अभ्यासिका * ऍसपायर अभ्यासिका * टपरस क्लब अभ्यासिका * शारदा ऍकॅडमी * फ्युजन स्टडी क्लब अभ्यासिका * महाराष्ट्र अभ्यासिका* सुन्या आय.ए.एस.* अर्थ व्यवस्था मोफत कार्यशाळा * रांजणगाव पार्क येथे प्रति गुंठा जागा विक्री * पोलिस भरती, आरंभ लर्निंग सेंटर

 

Web Title :- Pune PMC News | Competition exam students and beauty parlor advertisements are doing city disfigurement! Kasba – Vishram Bagh Regional Office hit 12 institutions; A case has been filed with the police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana | खासदार नवनीत राणांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने; म्हणाल्या…

Cabinet Incentive Scheme | भीम अ‍ॅप आणि रूपे डेबिट कार्डसाठी मोदी सरकारची भरीव तरतूद

Hasan Mushrif | चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ ऑफरबाबत बोलले हसन मुश्रीफ; म्हणाले…