Pune PMC News – Gokhale Institute | शहराचा सातत्यपूर्ण अभ्यास करण्यासाठी महापालिका गोखले इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ‘अर्बन ऑब्झर्वेटरी’ स्थापन करणार : महापालिका आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News – Gokhale Institute | शहराची हद्दवाढ, उद्योग व्यवसायांची रेलचेल, लोकसंख्या वाढ, वाहनांची वाढती संख्या याचा सातत्याने अभ्यास करून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी गोखले इन्स्टिट्युटच्या मदतीने ‘अर्बन ऑब्झर्वेटरी’ स्थापन करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News – Gokhale Institute)

पुणे शहर परिसरात मागील काही वर्षात मोठ्याप्रमाणावर उद्योग, व्यवसायासोबत शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण झाले आहे. यामुळे रोजगार आणि शिक्षणासाठी येथे स्थायिक होणार्‍यांची संख्याही वाढत आहे. लोकसंख्या वाढत असताना सार्वजनिक वाहतुकीची साधने त्याप्रमाणात नसल्याने खाजगी वाहनांची संख्याही वेगाने वाढत आहे. घरांची मागणी देखिल वाढत आहे. या सर्वांचा ताण येथील, रस्ते, पाणी, वीज तसेच अन्य नागरी सुविधांवर पडत आहे. (Pune PMC News – Gokhale Institute)

घरांची मागणी भागविण्यासाठी नवीन बांधकाम नियमावली (यूडीपीसीआर) तूर्तास फायदेशीर ठरत आहे. परंतू त्याचवेळी भूसंपादन प्रक्रिया फार किचकट असल्याने रस्त्यांची रुंदी मात्र वाढत नाही. ड्रेनेज लाईन असो अथवा पावसाळी लाईन असोत ही रस्त्यांच्या मधूनच टाकावी लागत आहेत. रहदारीच्या रस्त्यांवर त्यांची स्वच्छता आणि डागडुजी करणेही अवघड होउन बसते. यामुळे वाहतुकीची कोंडी, ध्वनी आणि वायू प्रदूषण अशा अनेक नवीन समस्या निर्माण होतात. यामुळे शहरातील काही भागातील प्रामुख्याने मध्यवर्ती पेठांतून रहिवाशांचे उपनगरांकडे स्थलांतर होत आहे. त्याचवेळी नव्याने विकसित होणार्‍या उपनगरांमधील घरांची उपलब्धता आणि त्यांचे दर काहीसे कमी असल्याने ही उपनगरे वेगाने विकसित होत आहेत. परंतू या परिसरामध्ये गुंठेवारीमुळे मैदाने, उद्याने यासारख्या अन्य सुविधांसाठी जमिनीची वानवा असल्याने संतुलन बिघडत चालले आहे.

यासंदर्भाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे विचारणा केली असता,
ते म्हणाले की शहर ज्य गतीने विकसित होत आहे,
त्या गतीने पायाभुत सुविधा निर्माण करण्यात अनेक तांत्रिक आणि आर्थिक अडचणी आहेत.
नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी शहराच्या गरजेनुसार काळारुप निर्णय घेणे
आणि सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. यासंदर्भाने शहरातील सर्वच बदलांचा सातत्याने अभ्यास व
त्यानुसार उपाययोजना करण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने
‘अर्बन ऑब्झर्वेटरी’ स्थापन करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून मिळणार्‍या माहितीचे आणि उपाययोजनांचे प्रतिबिंब अंदाजपत्रकातून दिसेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust | ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’
कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल; विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन