Pune PMC News | आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांचे हिलटॉप हिलस्लोपवरील इमारतीत बेकायदा पुर्नवसन; महापालिकेने इमारतीच्या मालकाला बजावली नोटीस : रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त

पुणे – Pune PMC News | मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकालगत (Gangadham Chowk, Market Yard, Pune) असलेल्या आनंदनगर झोपडपट्टीतील (Anandnagar Slum) रहीवाश्यांचे बिबवेवाडीतील हिलटॉप-हिलस्लोपवर बेकायदेशीररित्या बांधलेल्या इमारतीत पुर्नवसन केल्याची महापालिकेने (PMC) गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी संबधित इमारतीच्या मालकाला नोटीस बजावली असून आनंदनगर झोपडपट्टीची पुर्नवसन मोहीम बंद ठेवली आहे, अशी माहीती अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे (Additional Municipal Commissioner Ravindra Binwade) यांनी दिली. दरम्यान, आनंदनगर येथील झोपडपट्टीवासियांचे त्याच ठिकाणी एसआरए मार्फत पुर्नवसन करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्यावतीने आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. (Pune PMC News)

आनंदनगर झोपडपट्टीच्या मागील बाजूस असलेल्या बांधकाम व्यावसायीकाने मागील महिन्यांत आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांच्या घरांवर हातोडा चालविण्यास सुरूवात केली.
येथील काही कुटुंबियांचे बिबवेवाडी हिलटॉप हिलस्लोपवर बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये पुर्नवसन करण्यात आले आहे.
परंतू या इमारती बेकायदा असल्याने भविष्यात अडचणींचा सामना करावा लागेल या भितीने काही नागरिकांनी बांधकाम व्यावसायीकाच्या कारवाईला विरोध केला.
यावरून भाजपचे आमदार, स्थानीक नगरसेवक आणि नागरिकांमध्ये वाद झाला. यामध्ये नागरिकांना शिवीगाळही करण्यात आली. नागरिकांनी याप्रकरणी पोलिस आयुक्तांकडे ऑनलाईन तक्रार केली मात्र अद्याप त्यावर कुठलिही कारवाई झालेली नाही.

महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) याची दखल घेत एस.आर.ए. च्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. यामध्ये प्रामुख्याने नागरिकांच्या पुर्नवसनावर चर्चा झाली.
सर्वसाधारण सभेमध्ये आनंदनगर येथून २०५ नुसार रस्ता आखल्याने आनंदनगरमध्ये नियोजीत असलेली एस.आर.ए. स्किम रद्द करण्यात आली आहे.
त्यामुळे रस्त्यामुळे बाधित नागरिकांचे पुर्नवसन महापालिकेने करायचे आणि उर्वरीत नागरिकांचे पुर्नवसन करण्याची जबाबदारी ही एस.आर.ए.कडे राहील असा निर्णय या बैठकीमध्ये झाला आहे.
तसेच हिल टॉप हिल स्लोपवर बांधलेल्या इमारतीमध्ये करण्यात आलेेले पुर्नवसन देखिल बेकायदा असून इमारतही बेकायदा असल्याने बांधकाम विभागाने विकसकाला नोटीस बजावली आहे,
अशी माहिती रविंद्र बिनवडे यांनी दिली. (Pune PMC News)

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आज संजय दामोदरे यांच्या नेतृत्वाखाली आनंदनगर येथे
एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केले. संबंधित बांधकाम व्यावसायिक, आमदार, नगरसेवक यांच्यावर कारवाई करावी
व झोपडपट्टीवासियांना अधिकृतरित्या आहे त्या जागेवर पक्की घरे बांधून द्यावी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Web Title :- Pune PMC News | Illegal resettlement of Anandnagar slum dwellers in a building on Hilltop Hillslope; Municipal Corporation issues notice to building owner : Ravindra Binawade, Additional Municipal Commissioner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, 755 कोटींची मदत जाहीर

Abdul Sattar | अब्दुल सत्तार यांचा उद्धव ठाकरे यांना टोला, शिंदेंचे नेतृत्व माना…अन्यथा तुमची शिवसेना…