Pune PMC News | कॅपिटल व्हॅल्यू बेसड् मिळकत कर आकारणी ऐवजी महापालिका जेवढ्या सुविधा पुरविते तेवढाच कर आकारावा

आम आदमी पार्टीचा महाापलिकेला उपरोधीक टोला

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | ज्या सोसायट्यांमध्ये जास्त सुविधा आहेत त्यांनी जास्त कर भरावा अशी कॅपिटल व्हॅल्यू बेसड् मिळकत कर आकारणी करण्यास आतापासूनच विरोध होउ लागला आहे. आम आदमी पार्टी अर्थात आपने कॅपिटल व्हॅल्यू बेसड् मिळकत कर आकारणी करता नागरिकांनी अधिकचे पैसे देउन घेतलेल्या सुविधांऐवजी महापालिका नागरिकांना काय सुविधा देते त्यावर कर आकारणी केली पाहीजे, असा उपरोधीक टोला हाणला आहे. (Pune PMC News)

 

आपचे राज्य संघटक आणि पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी महापालिका कॅपिटल व्हॅल्यू बेसड् मिळकत कर आकारणी करणार आहे, याबद्दल अद्याप स्पष्ट धोरण मांडलेले नाही. परंतू महापालिकेने जो अभ्यास सुरू केला आहे आणि महापालिका आयुक्तांनी जेवढ्या अधिक सुविधा तेवढा अधिक कर असे जे म्हंटले आहे, ते पुणेकरांच्या पचनी पडणारे नाही. सुविधा या शब्दाचा विचार करताना पालिका पुरवत असलेल्या सुविधा असा घ्यायला हवा. त्या जर दिल्या जात असतील तरच कर आकारणी केली जावी असा त्याचा अर्थ असायला हवा.ज्या सुविधा पालिका देतच नाही त्यासाठी कर लावणे योग्य नाही. अशी भूमिका आम आदमी पक्षाने यापूर्वीच घेतली आहे. (Pune PMC News)

पालिकेमार्फत जी योजना राबवली जाणार आहे त्यामध्ये सुविधा या शब्दाचाच अर्थ बदललेला दिसता आहे. ज्या सोसायट्यामध्ये जलतरण तलाव, क्रीडांगण, सभागृह, जिम, हॉटेल. क्रीडांगण व इतर सुविधा आहेत त्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे व या सुविधांची वर्गवारी करून कर आकारणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार पचनी न पडणारा आहे. म्हणजे नागरिकांना स्वत: निर्माण केलेल्या सुविधा मिळत आहेत म्हणून त्यांना कर आकारणी जास्त करायची हा प्रकार काहीसा विचित्र वाटतो.
एखाद्या सोसायटीमध्ये पालिका पाणी पुरवू शकत नाही परंतु त्या सोसायटीमध्ये स्वतःचे बोअरवेल आहे.
जिम, क्रीडांगण, आसपास कुठेतरी पंचतारांकित हॉटेल आहे.
म्हणून त्यांना जास्त कर आकारणी करायची हे योग्य वाटत नाही, असे कुंभार यांनी नमूद केले आहे.

 

Web Title :- Pune PMC News | Instead of capital value based income taxation, tax should be levied only on the amount of facilities provided by the municipality

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS-Shinde Group Alliance | हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र येत असतील तर हे नैसर्गिक आहे, शिंद गटाच्या प्रवक्त्यांचे मनसे-शिंदे गट युतीचे संकेत

 

Varsha Usgaonkar | …तर वर्षा उसगांवकरांना सडके मासे खाऊ घालू

 

Cyrus Mistry | डेटा रेकॉर्डर चिप उघड करणार कार दुर्घटनेचे रहस्य? जर्मनीत मर्सिडीज करणार डिकोड