Pune PMC News | पुणे मनपा आयुक्तांना जलपर्णी भेट ! नदीपात्रालील जलपर्णी काढण्यासाठी माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांचे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | खराडी – चंदननगर प्रभागात नदीपात्रात असलेल्या जलपर्णी व त्यामुळे निर्माण होत असणाऱ्या डासांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या गंभीर विषयी आज (बुधवार) माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांनी पुणे मनपा कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच पुणे मनपा आयुक्तांची भेट घेवून नदीपात्रातील जलपर्णी भेट देऊन ही जलपर्णी तातडीने काढण्याची मागणी केली.(Pune PMC News)

यावेळी महेंद्र पठारे (Mahendra Pathare) यांनी निवेदन देवून नदिपात्रातील जलपर्णी लवकरात लवकर काढावी
अशी मागणी केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले की, खराडी चंदननगर परिसरात असणाऱ्या समस्यांचे निराकरण केले
जात नाही. त्यामध्ये नदीपात्रात असलेली जलपर्णी व त्यामुळे होणारे डास ह्या सर्व तक्रारी वेळेवर सोडवल्याजात नाहीत.
नदी काठी असलेले नागरिक या वाढत्या जलपर्णीमुळे त्रस्त झाले आहेत.

मुळा मुठा नदीपात्रात साचलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण स्वत: भेट देऊन पाहणी करावी.
तसेच लवकरात लवकर नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा ! नादब्रह्म सर्ववादक, रंगारी रॉयल्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, श्री राम पथक, गरूड स्ट्रायकर्स संघांची विजयी कामगिरी

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : ‘मी इथला भाई आहे’ सुट्ट्या पैशांवरुन रिक्षा चालकाकडून प्रवाशाला दगडाने मारहाण, आरोपी गजाआड

Maharashtra News | काय सांगता ! होय, चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी ! मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जुन्या वादातून तरुणाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण, 6 जणांना अटक