Pune PMC News | कमला नेहेरू रुग्णालयाची बत्ती गुल, पालिकेचे दुर्लक्ष; अतिदक्षता विभागातही रुग्ण विजेशिवाय…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- Pune PMC News | पुणे शहरातील एक महत्त्वपूर्ण सरकारी रुग्णालय म्हणजे मंगळवार पेठेतील कमला नेहेरू रुग्णालय (Kamala Nehru Hospital) आहे. शहरातील अनेक गरजू व जेष्ठ नागरिकांसाठी कमला नेहरूमधील उपचार संजीवनी प्रमाणे आहे. मात्र या महत्त्वपूर्ण रुग्णालयास महापालिका (Pune PMC News) किती महत्त्व देते हे समोर आले आहे. कमला नेहेरू रुग्णालयात तब्बल तीन तास वीज पुरवठा खंडीत झाला (Power Outage) असून याकडे पालिकेचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

कमला नेहेरू रुग्णालयात अनेक पेशेंन्ट (Patient) असताना तीन ते चार तास बत्ती गुल होती. रुग्णालयातील जनरेटर (Generator) हा फक्त नावाला ठेवला असून, त्याची वाय़र जळाल्यामुळे तो जनरेटर ही निकामी झाला आहे. सरकारी रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत आहे का ते पाहणे, हे पालिकेच्या विद्युत विभागाचे (PMC Electricity Department) काम आहे. मात्र विभागाला त्याच्या कामाचा जणू विसर पडला असून, त्यांचे रुग्णालयातील विजेकडे अजिबात लक्ष नसल्याचे दिसून आले. रुग्णालयात अतिदक्षता विभागात म्हणजेच आयसीयुमध्ये intensive Care Unit (ICU) अनेक रुग्ण असून, रुग्णालयातील डायलिसिस सेंटर (Dialysis Center), ऑपरेशन थिएटर (OT), लहान मुलांचा १६ नंबर वॉर्ड, १७ व १८ नंबर ओपीडी (OPD) एवढेच काय तर हृदयरोग विभागाचीही (Cardiology Department) वीज सकाळी सव्वा दहा पासून बंद आहे.

हॉस्पिटलमध्ये जुन्या इमारतीचा विजेचा पुरवठा खंडित झाला असून, अनेक महिन्यांपासून एका लिफ्टचे
(Elevator) काम देखील रखडले आहे. पालिकेच्या (Pune PMC News) या भोंगळ कारभारामुळे रुग्णांच्या
जीवाशी खेळ होत आहे. व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या प्रकरणावर महापालिकेचे विद्युत विभाग प्रमुख श्रीनिवास कुंदल (Shreenivas Kundal ) यांनी स्पष्टीकरण
दिले असून ते म्हणाले आहेत की, “कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असला तरी तो पूर्वरत
केला जात आहे. विजेची वाढती मागणी व उष्णता यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरी त्या दूर
करून विद्युत पुरवठा सुरळीत केला जात आहे.”

Web Title :  Pune PMC News | Kamla Nehru Hospital’s Batti Gul, Municipal Neglect; Even in the intensive care unit, patients without electricity

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Online Free Ration Card | सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशन कार्डसाठी एजंटला पैसे द्यावे लागणार नाहीत; घरबसल्या मोफत मिळवा रेशन कार्ड, जणून घ्या प्रोसेस

Pune NCP Protest News | पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रिजर्व बॅंक ऑफ इंडियाच्या बाहेर 2 हजार रुपयांच्या नोटांना श्रद्धांजली (Video)