Pune PMC News | महापालिका आणि शिक्षणमंडळाकडील अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांना 1 जानेवारीपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन आणि पेन्शन मिळणार – रविंद्र बिनवडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिका आणि शिक्षण मंडळाकडील अधीकारी आणि सर्वच कर्मचार्‍यांचे वेतन आणि पेन्शन न चुकता प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला होणार आहे. यासाठी महापालिकेने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये डाटा अपलोडींग आणि चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च आला असून महाराष्ट्र बँक सीएसआर मधून हा खर्च उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिली. (Pune PMC News)

महापालिकेने अनेक सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. यामध्ये कर्मचार्‍यांच्या हजेरीपासून वेतनापर्यंतच्या सॉफ्टवेअरचाही समावेश आहे. सध्या महापालिकेचे सुमारे १८ हजार कायम, रोजंदारी आणि कंत्राटी तसेच शिक्षण मंडळाकडील सुमारे ७ हजार कायम, रोजंदारी आणि कंत्राटी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे ‘बिल क्लार्क’च्या माध्यमातून वेतन तसेच पेन्शन देण्यात येत आहे. यासाठी वापरण्यात येणारी संगणक प्रणाली ही अगदीच जुनी असल्याने कर्मचार्‍यांच्या रजा व अन्य देणी अथवा येणी कॅल्क्युलेशनमध्ये चूक झाल्यास वेतनालाही विलंब होतो. यामुळे कर्मचार्‍यांना बँक लोन्स व इतर देणी देण्यातही अडचणी निर्माण होतात. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने मागीलवर्षी वेतन आणि पेन्शनसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्याचा निर्णय घेतला. (Pune PMC News)

हे सॉफ्टवेअर तयार झाले असून त्यामध्ये कर्मचार्‍यांची विभागवार आणि श्रेणीनिहाय इत्यंभूत माहिती लोड करण्यात आली आहे. या कामासाठीच बराच वेळ लागला. यानंतर तांत्रिक तपासणी देखिल करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी बायोमेट्रीक हजेरी मशीन्सही लावण्यात आली आहेत. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून येत्या एक जानेवारीपासून सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात पहिल्याच दिवशी वेतन आणि पेन्शन जमा होणार आहे. सध्या वेतनासाठी १५० बिल क्लार्क नेमलेले आहेत. या सॉफ्टवेअरच्या वापरानंतर या बिलक्लार्ककडे अन्य काम सोपविण्यात येणार आहे. तर सॉफ्टवेअर संचलनासाठी केवळ २५ जणांचा स्टाफ पुरेसा होणार आहे, अशी माहिती बिनवडे यांनी दिली.

शिक्षण मंडळाकडील हंगामी शिक्षक आणि रोजंदारीवरील कर्मचार्‍यांचे वेतन दोन दिवसांत

शिक्षण मंडळाकडे एकवट वेतनावर शिक्षक नेमले आहेत.
तसेच रोजंदारीवर शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
मागील काही महिन्यांपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना अगदी महिन्याच्या तिसर्‍या
आठवड्यापर्यंत वेतनासाठी वाट पाहावी लागत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता रविंद्र बिनवडे यांनी येत्या दोन दिवसांत सर्वांचे वेतन होउन जाईल, असे सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Skysign Department | पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची जाहीरात फलक
आणि नाम फलकात गल्लत ! व्यापार्‍यांना दुकानांवरील पाट्यांसाठी पाठविल्या जाहीरात फलक
दराने पैसे भरण्याच्या नोटीसेस