Pune PMC News | पुण्यात बांधकाम, उद्याने, मैदाने आणि वॉशिंग सेंटरसाठी कायमस्वरूपी एसटीपीच्याच पाण्याचा वापर बंधनकारक?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | भविष्यातील पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज (Need Of Drinking Water In Pune) ओळखून महापालिकेने आतापासूनच पाण्याच्या पुनर्वापराचा गांभीर्यान विचार सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून मैलापाणी प्रक्रिया केंद्रांमधील Sewage Treatment Plant (STP) पाण्याचा वापर बांधकाम, उद्याने, मैदाने, उद्योग, वॉशिंग सेंटरसारख्या ठिकाणी करण्यासाठी आतापासूनच पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. तसेच अधिकाअधिक मैलापाण्यावर एनजीटीच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रक्रिया करण्यासाठी शहरातील तीन जुने एसटीपी प्लांट (Old STP Plant In Pune) पाडून नव्याने बांधण्यासोबतच समाविष्ट २३ गावांमध्ये आणखी ८ प्लांटस्चा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News)

यंदा पावसाळा लांबला आहे. धरणसाखळीत ५ टीएमसी पाणीसाठा आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने तीन आठवड्यांपासून आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा बंद ठेवायला सुरूवात केली आहे. त्याचवेळी बांधकामांसाठी पिण्याचे अथवा बोअर व विहीरींचे पाणी वापरण्यास बंदी केली आहे. त्याऐवजी महापालिकेच्या एसटीपी प्लांटमधील पाणी मोफत उपलब्ध करून दिले आहे. जे बांधकाम व्यावसायीक हे पाणी वापरणार नाही त्यांना नोटीसेस बजावण्यात येणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून दररोज २ लाख लिटर पिण्याच्या पाण्याची बचत होत आहे. हा धागा पकडत आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, की लोकसंख्या वाढत असताना पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत जाणार आहे. यासाठी पाण्याच्या पुनर्वापराला प्राधान्य द्यावे लागणार आहे. (Pune PMC News)

यासाठी एसटीपीच्या पाण्याचा अन्य कारणांसाठी वापर हा प्रमुख मार्ग राहाणार आहे. एनजीटीच्या नॉर्म्सनुसार प्रक्रिया केलेले मैलापाणी बांधकामासाठी उपयुक्त ठरणार आहे.
तसेच उद्याने, खेळांची मैदाने, वॉशिंग सेंटरसाठीही उपयुक्त ठरणार आहे.
जायका कंपनीच्या सहकार्याने सुरू असलेल्या नदी सुधार योजनेअंतर्गत ११ एसटीपी प्लांटस्चे काम सुरू आहे.
जुन्या १० एसटीपींपैकी भैरोबा, नायडू हॉस्पीटल येथील प्लांटसह तीन प्लांट पाडून नवीन बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
तसेच ६ प्लांटस्चे नूतनीकरण करावे लागणार आहे. यासाठी ८५० कोटी रुपये खर्च आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी २५ टक्के हिस्सा देणार असून उर्वरीत खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.
तसेच समाविष्ट २३ गावांमध्येही ८ एसटीपी प्लांटस् व ड्रेनेज लाईन उभारण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे.
यासाठी एक हजार ४०० कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे.
या कामासाठी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनसोबत कमी व्याजदराने कर्ज मिळावे यासाठी प्राथमिक चर्चा देखिल झाली आहे.

महापालिका हद्दीत निर्माण होणार्‍या संपुर्ण मैलापाण्यावर एनजीटीच्या नॉर्म्सनुसार प्रक्रिया झाल्यानंतर ते पाणी बांधकाम, उद्याने, हिरवळीची मैदाने, वॉशिंग सेंटरसाठी वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
यातून दरवर्षी काही टीएमसी पिण्याचे पाणी आणि ग्राउंड वॉटरची बचत होउन नागरिकांना पिण्यासाठी व अत्यावश्यक वापरासाठी देणे शक्य होणार आहे.
तसेच मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजनेअंतर्गतही नदीपात्रामध्ये प्रक्रिया केलेले पाणी सोडून कमीत कमी प्रदूषण राखण्यासाठी मदत होणार आहे.
याची सुरुवात महापालिकेने स्वत:पासून केली असून यापुढील काळात शहरातील उद्याने आणि मैदानांना,
दुभाजकांवरील झाडांसाठी केवळ एसटीपी प्लांटस्चेच पाणी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,
असेही विक्रम कुमार यांनी नमूद केले.

Web Title :   Pune PMC News | Permanent for construction, parks, grounds and washing centers Use of STP water will be made mandatory: Vikram Kumar, Municipal Administrator and Commissioner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shasan Aplya Dari | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना योजना व सेवांच्या लाभाचे वाटप

Mahatma Basaveshwar Statue Nigdi Pune | पुणे : निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते अनावरण

CM Eknath Shinde | ‘असा मुख्यमंत्री कधी पाहिलाय का? जे बोलतो ते…’ – एकनाथ शिंदे (व्हिडिओ)