Pune PMC News | डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमधील रस्त्यांवर अन्य कामांच्या खोदाईमुळे ‘खड्डे’ ! रिइंन्स्टमेंटचे काम करणार्‍या ठेकेदारांवर महापालिका कारवाई करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | निकृष्ठ दर्जाच्या कामामुळेच शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. गेल्या काही महीन्याच्या कालावधीत तयार केलेल्या (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) 120 रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. तसेच विविध कारणासाठी केलेल्या खोदाईनंतर तेथे व्यवस्थित दुरुस्ती केली नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे प्रशासनाने संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune PMC News)

 

शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरातील रस्त्यांवर गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे आणि त्यात साठलेल्या पाण्यामुळे वाहतुकीची गती मंदावली आहे. तर खड्ड्यांची दुरुस्ती सुरु असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. यासंदर्भात आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार म्हणाले, महापालिकेच्या प्रत्येकी एकप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयात रस्ते दुरुस्ती वाहन उपलब्ध करून दिले आहे. या वाहनाच्या माध्यमातून प्रति दिन चाळीस ते पन्नास खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. त्याच प्रमाणे आदर पुनावाला फाऊंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध वाहनाच्या मदतीने प्रति दिन 40 ते 50 खड्डे बुजविले जात आहे. जेट पॅचर मशिनच्या माध्यमातूनही तेवढेच खड्डे प्रति दिन बुजविले जात आहे. गेल्या आठ दिवसापासून हे काम सुरु आहे. पावसाने उघडीप दिल्याने खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मी स्वत: आणि अतिरीक्त आयुक्त हे देखील या कामांची पाहणी करीत आहोत. पथ विभागाचे प्रमुख, कार्यकारी अभियंता यांचेही या कामाकडे लक्ष आहे. (Pune PMC News)

रस्त्याच्या काम करणार्‍या ठेकेदारावर रस्त्याच्या दुरुस्तीची लायबिलीटी पिरीड निश्चित केला असतो. असे गेल्या काही महीन्यात काम पुर्ण झालेल्या 120 रस्त्यांवरही खड्डे पडले आहे. या रस्त्यांवर खड्डे का पडले, कामाची गुणवत्ता तपासुन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. पुढील काळात रस्त्यांवर खड्डे पडू नये त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी तसेच रस्ते बांधण्यासाठी वापरण्यात येणार्‍या सामानाची गुणवत्ता यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिल्याची माहीती विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC News | ‘Potholes’ due to excavation of other works on the roads
during the defect liability period! The municipality will take action against the contractors doing the reinstance work

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा