Pune PMC News | स्टँडींग कमिटीतील ‘माझे ते माझेच आणि तुमचे तेही माझेच’ यावरून यापुर्वीच्या कमिटी सदस्य व पदाधिकार्‍यांमध्ये १० महिन्यांनंतरही संघर्ष सुरूच

पुणे – Pune PMC News | ‘ना खाउंगा ना खाने दुंगा’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा जनतेला आकर्षित करण्यासाठी वरकरणी आकर्षक वाटत असली तरी प्रत्यक्षात त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी देखिल त्याचे अनुकरण करत नसल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. विकास कामांच्या टेंडरमध्ये आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे यासाठी पालिकेतील माजी पदाधिकारी आपसात ‘संघर्ष’ करत असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर मागील दोन अडीच वर्षात ‘स्टँडींग’ कमिटीमध्येही ‘माझे ते माझेच आणि तुमचे तेही माझेच’ यावरूनही उघडउघड संघर्ष सुरू झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Pune PMC News)

महापालिका निवडणूक न झाल्याने १५ मार्च २०२२ पासून महापालिका आयुक्तच प्रशासक म्हणून काम पाहात आहेत.
शहरातील सर्व विकासकामांचे निर्णय प्रशासनच घेत असल्याने सर्वसामान्य माजी नगरसेवक प्रभागातील समस्या घेउन महापालिकेत येत आहेत.
मात्र, मागील पाच वर्षांमध्ये पदाधिकारी राहीलेली काही मंडळी त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळावित यासाठी आजही पालिकेत तळ ठोकून असतात.
नुकतेच शहरातील रस्त्यांच्या कामाच्या पॅकेज चार मधील ५३ कोटी रुपयांच्या कामावरून दोन माजी सभागृह नेते एकमेकांसमोर ठाकले होते.
तर एका आमदारानेही यासाठी स्टेक लावला होता. यासाठी दोन्ही बाजूने ‘नागपूर’ च्या दोन नेत्यांची नावे वापरण्यात आली. राज्यातील सत्तेच्या दबावाखाली असलेल्या प्रशासनाने अखेर हे टेंडरच रद्द केले.
विशेष असे की शहरातील रस्त्यांच्या कामासाठी पाच पॅकेजमध्ये काढण्यात आलेल्या सर्व निविदांसाठी एकसारखीच
नियमावली असताना व सर्व टेंडरमध्ये बहुतांश ठेकेदार तेच असताना कागदपत्रातील त्रुटी दाखवून पॅकेज
चारसाठीही लढाई सुरू होती. अखेर प्रशासनाने हे टेंडर रद्द केले. (Pune PMC News)

यापाठोपाठच दुसरी एक घटना घडली. स्थायी समितीमध्ये ‘टक्केवारी’ मुळे पक्षविरहीत राजकारण करणार्‍यांचा पदाचा कार्यकाळ संपून दहा महिने उलटले तरी ‘हिस्साच’ न मिळाल्याने उद्रेक झाला.
स्थायी समितीच्या शेवटच्या वर्षात हजारो कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
यामध्ये नदी सुधार, नदी काठ सुधार, समाविष्ट गावातील ड्रेनेज लाईन, पीपीपी तत्वावरील सुमारे एक हजार कोटी रुपयांचे रस्ते आणि उड्डाणपुल अशा काहीशे कोटी रुपयांच्या निविदांचा समावेश आहे.
परंतू या प्रकल्पातील ‘टक्केवारी’च न मिळाल्याने स्थायी समितीतील बहुतांश सदस्य व्यथित झाले आहेत.
गेली दहा महिने पाठपुरावा केल्यानंतर संयमाचा बांध फुटलेल्या काही मंडळींनी थेट ‘कर्णधारा’चेच घर गाठत जाब विचारल्याची घटना व्हायरल झाली.
परंतू या घटनेनंतरही कर्णधार असो वा जबाबदार पदाधिकारी याचा खुलासा करण्यासाठी अद्याप पुढे न आल्याने ‘जेथे जळते तेथूनच धूर’ येत असल्याची प्रचिती येत आहे.

एकीकडे पक्षाच्या ध्येय धोरणावरून पक्षाचा शहरातील वरिष्ठ नेता ‘सोने नाणे विका, घर गहाण ठेवा आणि
जनतेची सेवा करा’ असा उपदेश देउन पक्षीय यंत्रणा चार्ज करण्याचा प्रयत्न करतो.
त्याचठिकाणी नगरसेवक, पदाधिकारी झाल्यानंतर ‘शिस्तबद्ध’ कार्यकर्ते ‘माझे ते माझे आणि तुझे तेही माझे’
या पद्धतीने ओरबडत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहे.

Web Title :- Pune PMC News | Pune PMC Standing Committee Even after 10 months, the conflict between former committee members and office bearers continues

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prisoners Release | प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 189 कैद्यांना विशेष माफी, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

Namita Thapar | सर्रास होणाऱ्या बॉडी शेमिंगबद्दल नमिता थापर हिने केले मोठे वक्तव्य; म्हणाली – ‘मला बऱ्याचदा मिशी असलेली……’