Pune PMC News | सिद्धार्थ नगर मधील रहिवाशांना मिळणार पक्की घरे – जगदीश मुळीक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | नगर रस्ता रुंदीकरणात बाधित ठरलेल्या रामवाडी मधील सिद्धार्थ नगर झोपडपट्टी धारकांना एसआरए (SRA) अंतर्गत घरे देण्याचे महापालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner) मान्य केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून खुळेवाडी ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहणाऱ्या (Pune PMC News) नागरिकांना हक्काचे पक्के घर मिळणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City President Jagdish Mulik) यांनी दिली.

 

जगदीश मुळीक म्हणाले, सिद्धार्थनगर वासियांची घरे 2007 मध्ये रस्ता रुंदीकरणात बाधित झाली होती. येथील रहिवाशांना खुळेवाडी येथील तात्पुरत्या स्वरूपात रहाण्यासाठी जागा दिली होती. मात्र त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना कोणत्याही स्वरूपाच्या सुविधा दिल्या जात नव्हत्या. असुविधेमुळे नागरिक त्रस्त होते. रहिवाशांना पक्की घरे मिळण्यासाठी जगदीश मुळीक, डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr. Siddharth Dhende) यांनी नागरिकांसासह एसआरएचे अधिकारी, महापालिका आयुक्त यांचे कडे वारंवार पत्रव्यवहार करून वारंवार बैठका घेतल्या होत्या.

 

एसआरएच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेने या रहिवाशांची सोय करावी असे पत्र दिल्यानंतर महापालिका आयुक्त, मालमता विभागाचे उपायुक्त यांचेशी बैठक घेऊन नागरिकांना विमाननगर, रामवाडी येथील एसआरए योजनेत घरे मिळावीत अशी मागणी बैठकीत केली होती. आयुक्ताच्या आदेशानंतर मालमत्ता विभागाचे उपायुक्त अजित देशमुख (Ajit Deshmukh) यांनी विमाननगर व रामवाडी येथील एसआरए इमारती मधील शिल्लक असणारी घरे खुळेवाडी येथे ट्रांनजीट कॅम्प मध्ये रहाणाऱ्या राहिवाशांना देण्याचे मंजूर केल्याचे पत्र दिले आहे. (Pune PMC News)

जगदीश मुळीक पुढे म्हणाले, आपण याबाबत एसआरए तसेच महापालिका अधिकारी यांच्याकडे टेबल टू टेबल असा
पाठपुरावा केल्यामुळे आज खुळेवाडी येथे स्थलांतर झालेल्या रहिवाशांना पक्की घरे देण्याचे मंजूर झाले आहे.
आयुक्तानी घेतलेल्या या निर्णयामुळे सिद्धार्थनगर मधील रहिवाशाना पक्की घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत सिद्धार्थ नगर मधील राहिवाशा मध्ये आनंदाचे वातावरण असून राहिवाशानी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक,
डॉ सिद्धार्थ धेंडे यांच्यासह अधिकाऱ्यांचे आभार मानले.

 

Web Title :- Pune PMC News | Residents of Siddharth Nagar will get solid houses – Jagdish Mulik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kasba Peth Bypoll Election | ओबीसींच्या प्रश्नानाकडे भाजपचे दुर्लक्ष – विजय वडेट्टीवार

Hera Pheri 3 |अखेर पुन्हा धुमाकूळ घालण्यासाठी राजू, शामसोबत बाबू भैय्या सज्ज; ‘हेरा फेरी 3’ च्या शूटिंगला झाली सुरुवात

Pune PMC News | सिध्दार्थनगर वासियांच्या घरांसाठी सहा पर्याय; महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव