Pune PMC Property Tax | मुदतीत मिळकतकर भरणाऱ्यांसाठीच्या लॉटरी योजनेची सोडत रविवारी, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लॉटरी सोडत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) हद्दीतील सर्व मिळकतधारकांना चालू आर्थिक वर्षातील (2023-24) मिळकतकराची (Pune PMC Property Tax) थकबाकीसह बिलाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख होती. थकबाकीसह संपूर्ण बीलाची रक्कम भराणाऱ्यांना सर्वसाधारण करावर (General Tax) 5 ते 10 टक्के सवलत देण्यात आली. तसेच ज्या मिळकतधारकांनी 31 जुलै पर्य़ंत संपूर्ण मिळकतकर (Pune PMC Property Tax) भरला आहे अशांसाठी बक्षिस लॉटरी योजना (Lottery Scheme) जाहीर करण्यात आली होती. या लॉटरी योजनेची सोडत (Draw) येत्या रविवारी (दि. 20) करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या (Pune PMC News) कर आकारणी व कर संकलन उप आयुक्त अजित देशमुख (Ajit Deshmukh) यांनी दिली आहे.

सन 2023-24 मध्ये मुदतीत मिळकतकर (Pune PMC Property Tax) भरणाऱ्या मिळकत धारकांना प्रोत्साहन
देण्याकरिता लॉटरी योजना सोडत कार्यक्रम उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री (Guardian Minister)
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे हस्ते होणार आहे. रविवार दुपारी बालवीर शिरीष कुमार माध्यमिक विद्यालय (Balveer Shirish Kumar Secondary School) पहिला मजला हॉल, मॉडर्न हायस्कूल समोर पोलीस वसाहत शेजारी येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) डॉ. कुणाल खेमनार (PMC Addl Commissioner Kunal Khemnar), उप आयुक्त, कर आकारणी व कर संकलन प्रमुख अजित देशमुख व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पुणे महापालिकेच्यावतीने 15 मे ते 31 जुलै या कालावधीत निवासी, बिगरनिवासी, मोकळी जागा यांचा
मिळकतकर भरणाऱ्यांना 1 कोटीपर्य़ंतची बक्षिस लॉटरी योजना जाहीर केली आहे. ज्यामध्ये 5 पेट्रोल कार, 15 ई-बाईक,
15 मोबाईल फोन, 10 लॅपटॉप अशी एकूण 45 बक्षिसे मिळकतधारकांना मिळणार आहेत. यासाठी कोणत्याही प्रकराचा
अर्ज करण्याची आवश्यकता नव्हती. केवळ संपूर्ण मिळकतकर 15 मे ते 31 जुलै या कालावधीत भरणे आवश्यक होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Saurabh Rao | राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात पुणे विभागातील सर्व कार्यालयांनी सहभाग घ्यावा – विभागीय आयुक्त सौरभ राव