Pune PMC Water Supply News | पुण्यात दि. 18 मे पासून आठवडयातून एक दिवस पाणी कपात, या दिवशी बंद राहणार शहराचा पाणी पुरवठा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Water Supply News | अल निनोच्या पार्श्वभुमीवर दि. 18 मे पासून आठवडयातून दर गुरूवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहेत. पाऊस चांगला झाल्यास अडचण येणार नाही. पाणी कपातीबाबत पुणे महानगरपालिका Pune Municipal Corporation (PMC) प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासोबत चर्चा केली असून उपाययोजनाबाबत त्यांना माहिती देण्यात आली आहे. (Pune PMC Water Supply News)

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 मे पासून आठवडयातून दर गुरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहेत. याबाबत मनपा प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना माहिती दिली आहे.

20 ठिकाणी एअर व्हॉल्व बसवले आहेत त्यामुळे दुसर्‍या दिवशी कमी दाबाने पाणी मिळते ही समस्या कमी होणार आहे.
आगामी काळात पाऊस कमी पडला तर अत्यावश्यक प्लॅनिंग मनपा प्रशासन करीत आहे.
आजूबाजूच्या गावातून टँकर आणता येतील तसेच टँक बंद ठेवता येतील. मुळशीमधून 5 टीएमसीची मागणी केली आहे.
शासनाने एक सदस्यीय समिती नेमली होती. त्यांचा पाठपुरवठा सुरू असल्याची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात
आली आहे.

Web Title :- Pune PMC Water Supply News | Pune Water cut for one day a week from May 18, city water supply will be closed on this day IAS Vikram Kumar Chandrakant Patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – 75 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील 7 जणांसह इचलकरंजीमधील एकाविरूध्द गुन्हा दाखल

Maharashtra Politics News | काका मला वाचवा म्हणायची अजित पवारांवर वेळ आली, शिंदे गटाच्या खासदाराची टीका

Pune – G20 Summit | पुणे : जी-२० परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न