Parth Ajit Pawar – PDCC Bank Pune | पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी पार्थ पवार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Parth Ajit Pawar – PDCC Bank Pune | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. कार्यबाहुल्यामुळे वेळ मिळत नसल्याचे कारण दिल्याने बँकेच्या संचालक मंडळाने हा राजीनामा मंजूर केला आहे. मात्र, पुढील संचालक कोण? यावर जोरदार चर्चा सुरू असून अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचे नाव आघाडीवर आहे. (Parth Ajit Pawar – PDCC Bank Pune)

अजित पवार यांनी १९९१ साली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद स्वीकारले. सलग ३२ वर्ष त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. या ३२ वर्षात अजित पवार चार वेळेस उपमुख्यमंत्री होते. आता पाचव्यांदा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत, तसेच पक्षात फूट पाडल्यानंतर नवीन गटाची जबाबदारी आणि नेतृत्व त्यांच्याकडे आहे.

परंतु, अजित पवारांसाठी सध्या असलेले हे काम काही नवीन नाही. तरी सुद्धा त्यांनी जे कारण सांगितलेले आहे, त्यामागील खरे कारण पुत्र पार्थ पवार यांच्या रिलाँचिंगचे आहे, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, अजित पवारांच्या जागेवर पार्थ पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक जाहीर केल्यानंतर ही निवडणूक लागणार आहे. बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून पार्थ पवार संचालक होणार आहेत. यासाठी संचालक मंडळ मतदान करणार आहे.

पक्षात फूट पाडून अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेल्यानंतर पार्थ पवार सातत्याने विविध कार्यक्रमात
त्यांच्यासोबत दिसत आहेत. पुण्यातील अजित पवारांच्या रोड शोमध्ये देखील पार्थ पवार हे सक्रिय सहभागी होते.

पदार्पणातच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात पराभव झाल्यानंतर सक्रिय राजकारणातून पार्थ
गायब झाले होते. आता बँकेच्या माध्यमातून त्यांचे रिलाँचिंग होत असल्याचे समजते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case News | प्रकरण मिटवुन घेण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर एसीबीकडून FIR