Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांनी केलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये 3765 गुन्हेगारांची झाडाझडती ! 90 सराईत गुन्हेगार गजाआड; 145 कोयते, 3 तलवार, 1 पिस्टल जप्त

 पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (बासित शेख) – 33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2022-23 (Maharashtra State Police Sports Tournament 2022-23) तसेच जी-20 च्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने संयुक्त कोंबिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) राबवण्यात आले. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची (Pune Police Crime Branch) पथके तयार करण्यात आली होती. कोंबिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) दरम्यान सराईत गुन्हेगारांची तपासणी करुन प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली. हे कोम्बिंग ऑपरेशन सोमवारी (दि.9) रात्री 9 ते मंगळवारी (दि.10) मध्यरात्री दोन या कालावधीत राबवण्यात आले. (Pune Crime News)

पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके (Bus Stop), रेल्वे स्टेशन (Railway Station) तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या मोहीमेत तब्बल 3765 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी 698 गुन्हेगार मिळून आले आहेत.

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 55 हजार 300 रुपयांचे 145 कोयते, 1 हजार 350 रुपयांच्या 3 तलवारी, 40 हजार रुपयांचे गावठी पिस्टल, 400 रुपयांचे एक काडतुस जप्त केले. गुन्हे शाखेने 9 आणि पोलीस स्टेशनने 34 असे एकूण 43 केसेस दाखल केले आहेत. तसेच 90 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाई दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकांनी 110 हॉटेल, लॉज तपासले तर पोलीस स्टेशनच्या पथकाने 427 हॉटेल, लॉज तपासले.

पर्यावरण कायद्यांतर्गत (Environment Act) गुन्हे शाखा युनीट एकने खडक पोलीस ठाण्याच्या (Khadak Police Station) हद्दीतून 1 हजार रुपयांचा नायलॉन मांजा (Nylon Manja) जप्त करुन सोहेल आरिफ खान याला अटक केली. तर युनिट पाचच्या पथकाने कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीतून 8 हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करुन अब्दुल रहेमान पापा शेख (वय-65) याला अटक केली आहे.

सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीतून निलेश गायकवाड (वय-35) याच्याकडून गावठी पिस्टल आणि जीवंत काडतुस असा एकूण 40 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने केली. तसेच युनिट पाचच्या पथकाने हडपसर पोलीस ठाण्यातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी अनिकेत इंगळे याला हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले.

खंडणी विरोधी पथक एकने (Anti Extortion Cell, Pune) सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून
75,750 रुपयांच्या विदेशी सिगारेट जप्त करुन मुदस्सर मोहम्मद याला अटक केली आहे.
तर अंमली विरोधी पथक दोनने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुक्का पार्लवर छापा टाकून
12 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत हॉटेल मालक शाहरुख शेख याला अटक करुन
कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले. याचप्रमाणे परिमंडळ एक ते पाच मध्ये कारवाई करुन गुन्हेगारांना अटक केली आहे.

महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हे शाखेने तीन व पोलीस स्टेशनने 12 असे
एकूण 15 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केली. नाकाबंदी कारवाईमध्ये 1531 संशयित वाहन चालकांना चेक
करुन 77 जणांवर कारवाई करुन 40 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तर वाहतूक शाखेने 1095 संशयित वाहन चालकांना चेक करुन 98 हजार 980 रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे(IPS Rajendra Dahale), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा
(IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त गुन्ह रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल
(DCP Sandeep Singh Gill), पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग (Traffic Branch Pune) विजयकुमार मगर
(DCP Vijayakumar Magar) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,
अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

Web Title :- Pune Police Combing Operation | In the ‘combing operation’ done by the Pune police, 3765 criminals were killed! 90 innkeepers jailed; 145 knives, 3 swords, 1 pistol seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार यांच्या आव्हानाला संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘सरकारमधले जे अतिशहाणे मंत्री आहेत त्यांनी…’

Arvind Sawant | अरविंद सावंत यांचे मशाल यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले…