ताज्या बातम्यापुणेपोलीस घडामोडी

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचे शहरात ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’, 3122 सराईतांची झाडाझडती; घातक हत्यारे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन (Pune City Police station) व गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) वतीने ऑल आऊट (All Out) कोम्बिंग ऑपरेशन मोहीम (Pune Police Combing Operation) राबवण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) व तपासणी करुन कारवाई केली. हे कोम्बिंग ऑपरेशन सोमवारी (दि.13) रात्री 10 ते मध्यरात्री 12 या कालावधीत राबवण्यात आले.

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके (Bus Stop), रेल्वे स्टेशन (railway station) तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या मोहीमेत तब्बल 3122 गुन्हेगारांना चेक कररण्यात आले असून त्यापैकी 565 गुन्हेगार मिळून आले आहेत.

 

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 1 हजार 250 रुपयांचे 5 कोयते, 300 रुपयांचे 2 सत्तुर, 200 रुपयांचे एक पालघन, 100 रुपयांची एक तलवार जप्त करुन 11 आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेने 03 आणि पोलीस स्टेशनने 9 असे एकूण 11 केसेस दाखल केले आहेत.

गुन्हे शाखा युनिट पाचने (Crime Branch Unit 5) कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) गुन्ह्यातील आरोपी सलीम शबीर चौधरी Salim Shabir Chaudhary (वय-24 रा. कोंढवा) याला अटक (Arrest) करुन पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. तर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) IPC 379 अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी ओमकार चंडबसाप्पा बिराजदार Omkar Chandabasappa Birajdar (वय-19 रा. काळेपडळ) याला अटक केली. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली. आरोपीला पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

 

मुंबई प्रोहिबिशन अ‍ॅक्ट (Mumbai Prohibition Act) प्रमाणे 4 केसेस करुन 5 आरोपींना अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून 3560 रुपये किमतीची 30 लिटर दारु जप्त करण्यात आली.
तसेच सीआरपीसी कायद्यानुसार (CRPC Act) 131 आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
तर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार (Maharashtra Police Act) 2 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केली.

 

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील 510 हॉटेल, ढाबे, गेस्ट हाऊस व लॉजेस चेक करण्यात आले.
याशिवाय 140 एसटी स्टँड, रेल्वे स्थानक, निर्जन ठिकाणे तपासण्यात आले आहेत.
तर नाकाबंदी दरम्यान 2510 संशयित वाहन चालकांना चेक करुन 2 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार, पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त (आर्थिक व सायबर) भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) अतिरिक्त कार्यभार अपर पोलीस आयुक्त गुन्हे,
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 प्रियंका नारनवरे (DCP Priyanka Narnaware), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad), पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), पोलीस उपायुक्त वाहतुक विभाग राहुल श्रीरामे (Traffic DCP Rahul Shriram)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले.

 

Web Title :- Pune Police Combing Operation | Pune police conducts ‘all out combing operation’ in the city, checking 3122 inns; Seizure of deadly weapons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra State Government | राज्य सरकारचा तुकडे बंदी कायद्याबाबत मोठा निर्णय ! केले ‘हे’ मुख्य बदल

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचा खून, मृतदेह फेकला निरा नदीत; 5 संशयित ताब्यात

 

Maharashtra Monsoon 2022 Update | मान्सूनची राज्यात विश्रांती, जोरदार सलामीनंतर झाले तरी काय ?

Back to top button