Pune Police Crime Branch News | कॅम्प परिसरातील MG Road परिसरात तंबाखुजन्य E-Cigarettes (वेप) विक्री करणार्‍या 3 दुकानांवर कारवाई

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून 2 लाख 32 हजाराचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | कॅम्प परिसरातील एमजी रोड (MG Road Camp Pune) परिसरात तंबाखुजन्य ई-सिगारेट (वेप) E-cigarettes (Vape) विक्री करणार्‍या 3 दुकानांवर पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) कारवाई केली आहे. पोलिसांनी 3 दुकानांमधून तब्बल 2 लाख 32 हजार 100 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान, तिघांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. (Pune Police Crime Branch News)

 

दुकानदारांवर जाहिरातीस प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनीयमन अधिनीयम 2003 व नियम 2004 चे कलम 7 (2), 20(2) तसेच इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध सुधारणा कायदा कलम 2019 चे कलम 5 सह 8 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांना लष्कर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Police Crime Branch News)

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव (Sr PI Bharat Jadhav) , सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote), सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे (API Rajesh Malegave), पोलिस अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, अमेय रसाळ, सागर केकान, रेश्मा कंक, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार आणि इम्रान नदाफ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  Pune Police Crime Branch News | Action taken against 3 shops selling tobacco
E-Cigarettes (Vape) in MG Road area of ​​camp area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा