Pune Police Crime Branch News | पुण्यातील सराईत गुन्हेगार ‘सैरभैर’! पोलिसांवर हल्ला केल्यानंतर गुन्हे शाखेकडून फायरिंग, 5 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांचे आठवड्यातून दुसर्‍यांदा कोम्बिंग ऑपरेशन, 3900 गुन्हेगारांची चेकिंग अन् 1334 सराईतांची झाडाझडती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री 10 ते शनिवारी पहाटे 1 वाजण्याच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन करून तब्बल 2 हजार गुन्हेगारांची चेकिंग करून तब्बल 695 सराईतांची झाडाझडती घेतली आहे. हे आठवड्यातील दुसरे कोम्बिंग ऑपरेशन होते. यापुर्वी पोलिसांनी सोमवारी (दि.3) रात्री 10 ते मंगळवारी पहाटे 1 वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवून तब्बल 1832 गुन्हेगारांची चेकिंग करत 639 सराईतांची झाडाझडती घेतली होती. म्हणजेच पोलिसांनी आठवड्याभरात तब्बल 3900 गुन्हेगारांची चेकिंग करून 1334 सराईतांची झाडाझडती घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे पुण्यातील सराईत गुन्हेगार सैरभैर झाले आहेत. शुक्रवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान दरोडयाच्या तयारीत असलेल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फायरिंग (Firing In Pune) करून दरोडेखोरांची धरपकड केली. यामध्ये 5 जणांना अटक करण्यात आली आहे. (Pune Police Crime Branch News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे (ACP Sunil Tambe), युनिट-3 चे पोलिस अधिकारी व अंमलदार हे वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन करत होते. शनिवारी पहाटे 1 वाजण्याच्या दरम्यान पोलिस अंमलदार प्रकाश कट्टे यांना म्हाडा कॉलनीच्या दिशेने म्हाडा वसाहतीजवळील सर्व्हिस रोडव्रील रोझरी स्कुलच्या बाजुला असलेल्या वापरत नसलेल्या बसस्टॉपवर अंधारामध्ये 9 ते 10 जण दोन गटांमध्ये संशयास्पद हालचाली करताना दिसले. (Pune Police Crime Branch News)

 

सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Sr PI Shrihari Bahirat), पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार (PSI Rahul Pawar) आणि युनिट-3 कडील पोलिस पथक हे संशयास्पद हलचाली करणार्‍यांना ताब्यात घेण्यासाठी जात होते. त्यावेळी एका संशयिताने पोलिसांच्या दिशेने पिस्तुल रोखुन फायर करण्याची तयारी केली. त्यावेळी सहाय्यक आयुक्त सुनिल तांबे यांनी संरक्षणार्थ त्यांच्या दिशेने सर्व्हिस पिस्टलमधुन फायर केले. पीएसआय पवार यांनी देखील एक राऊंड फायर केला. पोलिसांनी अचानक फायरिंग केल्यामुळे आरोपी हे अंधाराचा फायदा घेवुन पळुन जात असताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान पोलिस अंमलदार प्रकाश कट्टे यांच्या दिशेने आरोपींनी कोयता फेकुन मारल्याने त्यांच्या उजव्या पायाच्या नगडीस जखम झाली आहे.

 

पोलिसांनी अमोल अंकुश लामतुरे (27, रा. आनंदनगर पोस्ट ऑफिसजवळ, लातुर. सध्या रा. पुणे रेल्वे स्टेशन परिसर), राजु पुनीचंद शिंदे (39, रा. पुणे स्टेशन परिसर), सचिन मारूती खैरे (30, रा. मु.पो. भुगाव, ता. मुळशी, पुणे) , गणेश मारूती खैरे (32, रा. सर्व्हे नं. 33, सुभाष बराटे चाळ, दत्तनगर, वारजेगाव, पुणे) आणि अक्षय उध्दव सोळुंके (22, रा. दत्तनगर, वारजेगाव, पुणे) हे मेकॅड्रॉनिक्स या इमारतीच्या शेजारी असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक अग्नीशस्त्र, 4 जिवंत राऊंड, 2 लोखंडी कोयते, लोखंडी पाईप, लोखंडी कटावणी, हातोडी, स्कु्र-ड्रायव्हर, पक्कड व कटर जप्त करण्यात आले आहे. आरोपींविरूध्द वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट करीत आहेत.

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पाटील, पोलिस अंमलदार संतोष क्षीरसागर, शरद वाकसे, राजेंद्र मारणे, सुरेंद्र साबळे, प्रकाश कट्टे, सुजित पवार, संजीव कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते, किरण पवार, साईनाथ पाटील, सतिश कत्राळे, साईकुमार कारके, प्रताप पडवाळ, संतोष डोळस, सुनिल राऊत आणि नितीन काळे यांच्या पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांना अटक केली आहे.

 

शुक्रवार रात्री 10 ते शनिवारी पहाटे 1 : CP रितेश कुमार आणि Jt CP संदीप कर्णिक यांचा ऑपरेशनमध्ये सहभाग 129 कारवायांमध्ये 165 जणांना अटक

 

पुणे शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री 10 ते शनिवारी पहाटे 1 वाजण्याच्या दरम्यान संपुर्ण आयुक्तालयाच्या हद्दीत ऑल आऊट ऑपरेशन (कोबिंग) राबविले. त्यामध्ये तब्बल 2 हजार गुन्हेगारांचे चकिंग करण्यात आले असून त्यापैकी 695 गुन्हेगार मिळुन आले. त्यांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. विशेष मोहिमेदरम्यान एकुण 24 आर्म अ‍ॅक्ट गुन्ह्यांमध्ये तब्बल 24 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 1 पिस्टल, 23 धारदार हत्यारे जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) आणि पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. त्यांनी वेगवेगळया ठिकाणी भेटी देवुन पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदारांना मार्गदर्शन केले. (Pune Police All Out Operation)

 

ऑल आऊट ऑपरेशनमध्ये आर्म्स अ‍ॅक्टच्या 24 कारवाया करण्यात आल्या असून त्यामध्ये 24 जणांना अटक करण्यात आली. मुंबई प्रोव्हिबीशन अ‍ॅक्टच्या 73 कारवायामध्ये 73, मपोका क 142 प्रमाणे 5 कारवाया करून त्यामध्ये 5 जणांना, जुगार अ‍ॅक्टच्या 23 कारवाया करण्यात आल्या असून त्यामध्ये तब्बल 55 जणांना अटक करण्यात आली आहे. एनडीपीएसच्या (अंमली पदार्थ) 3 कारवाया करण्यात आल्या असून त्यामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे.
ऑपरेशनमध्ये एकुण 129 कारवाया करण्यात आल्या असून तब्बल 165 जणांना अटक करण्यात आली आहे.

 

पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police)
गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरेाधी पथक-2 Anti Narcotics Cell Pune (ANC Pune)
पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे (PI Sunil Thopte) आणि त्यांच्या पथकाने महात्मा फुले मंडई Mahathma Phule Mandai (Mandai Pune)
परिसरातून अफीम (Afim) आणि गांजा (Ganja) जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे (Pune Police Crime Branch News).
जगदीश कालुजी जाट Jagdish Kaluji Jat (27, सध्या रा. पुणे, मुळ रा. तहसील गंगरार, जि. चितोड, राजस्थान)
असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
अप्पर आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
झोन-1 चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), झोन-2 च्या
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), झोन-3 चे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma),
झोन-4 चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), झोन-5 चे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा
आणि सर्व पोलिस ठाण्यातील अधिकारी व पोलिस अंमलदार तसेच वाहतुक विभागाकडील अधिकारी
आणि अंमलदार यांनी ऑल आऊट ऑपरेशन राबवून सदरील कामगिरी केली आहे.

 

Web Title :  Pune Police Crime Branch News | After the attack on the police,
firing by the crime branch, 5 robbers arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा