Pune Police Crime Branch News | व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी, खंडणी विरोधी पथकाने सावकारांच्या आवळल्या मुसक्या

Pune Police Crime Branch News | Anti Extortion Cell Pune Arrest Moneylenders
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | दूध डेअरी व्यावसायिक तसेच नोकरदार यांनी पैशांची परतफेड केली असताना आणखी पैशांची मागणी करुन खाजगी सावकारांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch News) खंडणी विरोधी पथक दोनच्या Anti Extortion Cell Pune (AEC Pune) पोलिसांनी अवैध सावकारी करणाऱ्या तीन सावकारांवर खंडणी (Extortion Case) व सावकारी कायद्यांतर्गत (Moneylenders Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

 

यश संजय मेमाणे (Yash Sanjay Memane), मानव संजय मेमाणे Manav Sanjay Memane (दोघे रा. रविवार पेठ) यांच्यावर खडक पोलिसांनी सावकरी कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी आदेश राजू पवार (Adhesh Raju Pawar) या दुग्ध व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Police Crime Branch News)

 

फिर्यादी राजू पवार यांचा डेअरीचा व्यवसाय आहे. त्यांनी आरोपींकडून 1 लाख 90 हजार रुपये 10 टक्के महिना व्याजाने घेतले होते. आरोपींनी पवार यांचा टेम्पो गहाण ठेवून पैसे दिले होते. फिर्यादी यांनी आरोपींना फोन पे आणि रोख स्वरुपात 1 लाख 71 हजार रुपये व्याज देऊन गहाण ठेवलेला टेम्पो परत मागितला. मात्र आरोपींनी त्यांच्याकडे आणखी 2 लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे न दिल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातील स्मार्ट वॉच जबरदस्तीने काढून घेऊन गेले होते.

होम लोन व मॉर्गेज लोन व्यवसाय सुरु करण्यासाठी शनिवार पेठेत राहणारे प्रसाद अशोक मोटे (Prasad Ashok Mote) यांनी खासगी सावकार सुरज मनोज परदेशी Suraj Manoj Pardeshi (रा. गुजरवाडी, कात्रज) याच्याकडून 45 हजार रुपये 20 टक्के दरमहा व्याजाने घेतले होते. फिर्यादींनी त्या मोबदल्यात परदेशी याला गुगल पे व फोन पे वरुन 4 लाख रुपये ऑनलाईन तर 50 हजार रुपये रोख असे एकूण 4 लाख 50 हजार रुपये दिले होते. पैसे दिले असताना आरोपी परदेशी याने आणखी 1 लाख 53 हजार रुपयांची अवाजवी मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे न दिल्याने त्यांच्या घरी येऊन त्यांना शिवीगाळ करुन बदनामी करण्याची धमकी दिली. याबाबत प्रसाद मोटे यांनी सुरज परदेशी याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद दिली. पोलिसांनी परदेशी विरुद्ध सावकरी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokle),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे 2 सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-2 चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर
(Sr PI Pratap Mankar), सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajgane),
पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), मोहनदास जाधव
(PSI Mohandas Jadhav) व पोलीस अंमलदार विजय गुरव, सुरेंद्र जगदाळे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे, राहुल उत्तरकर, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, चेतन आपटे, पवन भोसले, किशोर बर्गे, प्रदिप गाडे, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title : Pune Police Crime Branch News | Anti Extortion Cell Pune Arrest Moneylenders


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Kale Padal police arrests man who stole 15 cars worth Rs 19 lakh from Khadi Crushing Plant; The theft was done with the help of a worker from Khadi Crushing Plant (Video)

Pune Crime News | खडी क्रशींग प्लांटमधील 19 लाखांच्या 15 मोटारी चोरणाऱ्यास काळे पडळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या; खडी क्रशींग प्लांटमधील कामगाराच्या मदतीने केली होती चोरी (Video)

Pune Crime News | Two thieves beat up a young man carrying a gold string for a mangalsutra and stole gold worth Rs 3 lakhs, the incident happened in the evening during the rush hour in Liyavar Peth (Video)

Pune Crime News | मंगळसुत्रासाठीची सोन्याची तार घेऊन जाणार्‍या युवकाला मारहाण करुन दोघा चोरट्यांनी 3 लाखांचे सोने नेले चोरुन, रविवार पेठेतील ऐन गर्दीच्या वेळी सायंकाळची घटना (Video)