Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगाराला अटक, 5 गुन्हयांची उकल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट-3 च्या पथकाने अट्टल घरफोडी करणार्‍या गुन्हेगाराला वारजे माळवाडी परिसरातील (Warje Malwadi Police Station) चैतन्य चौकातून ताब्यात घेवून अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी 2 लाख रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. (Pune Police Crime Branch News)

रोहित वसंत पासलकर Rohit Vasant Pasalkar (32, रा. फ्लॅट नंबर 308, परिजात हाईट्स, जाधव नगर, रायकर मळा, धायरी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेतील युनिट-3 चे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत होते. त्यावेळी पोलिस हवालदार राजेंद्र मारणे आणि पोलिस नाईक संजीव कळंबे यांना चोरीच्या पैशांची उधळपट्टी करणारा रोहित पासलकर हा चैतन्य चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. (Pune Police Crime Branch News)

प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचुन त्याला ताब्यात घेवून अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून घरफोडी चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल हन्डसेट असा एकुण 2 लाख रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. रोहित पासलकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरूध्द घरफोडी चोरी, जबरी चोरी, दुखापत यासारखे तब्बल 20 गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे (ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Sr PI Shrihari Bahirat), पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील (PSI Ajitkumar Patil), पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार (PSI Rahul Pawar), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर (Police Santosh Kshirsagar), पोलिस हवालदार राजेंद्र मारणे (Police Rajendra Marne), शरद वाकसे, किरण पवार, सुरेंद्र साबळे, संजित कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते, सतिश कत्राळे, प्रताप पडवळ, प्रकाश कट्टे, साईनाथ पाटील, साईकुमार कारके, सोनम नेवसे आणि भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune Police Crime Branch News | Pune crime branch arrested the house burglar, solved 5 crimes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा