पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने पर्वती पोलिस ठाण्याच्या (Parvati Police Station) हद्दीतील निलायम ब्रिजजवळ (Nilayam Bridge) पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून 2 पिस्टल आणि 7 जिवंत काडतुसे जप्त करण्यात (Pistol Seized) आली आहेत. (Pune Police Crime Branch News)
संतोष विनायक नातू Santosh Vinayak Natu (47, रा. मु.पो. पिंपळगांव, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक महिती अशी की, शुक्रवारी रात्री 10 ते शनिवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास संपुर्ण पुणे शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation ) सुरू होते. गुन्हे शाखेतील युनिट-3 चे पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार हे पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police All Out Operation) करीत असताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर (Police Santosh Kshirsagar) आणि पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते(
Dnyaneshwar Chitee) यांना पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी संतोष विनायक नातू हा पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) उद्यान कार्यालयासमोरील निलायम ब्रिज येथे पिस्टलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. (Pune Police Crime Branch News)
प्राप्त माहितीची पोलिसांनी खातरजमा केली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचुन पोलिसांनी आरोपीला अटक केले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 2 पिस्टल आणि 7 जिवंत काडतुसे आढळून आली आहे. पोलिसांनी ती जप्त केली असून त्याच्याविरूध्द पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे (ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट
(Sr PI Shrihari Bahirat), पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील (PSI Ajitkumar Patil), पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार
(PSI Rahul Pawar), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर, पोलिस अंमलदार राजेंद्र मारणे (Police Rajendra Marne),
शरद वाकसे, किरण पवार, सुरेंद्र साबळे, संजित कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते, सतिश कत्राळे, प्रताप पडवाळ, प्रकाश कट्टे, साईनाथ पाटील,
साईकुमार कारके, सोनम नेवसे आणि भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
Web Title : Pune Police Crime Branch News | Pune : Crime Branch arrests a criminal on record, seizes 2 pistols along with 7 live cartridges
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | लोकांच्या नावावर कर्ज काढून अनेकांची फसवणूक ! फसवणूक झालेल्या व्यवासायिकाची आत्महत्या; खराडीमधील घटना
- Maharashtra Political News | ‘स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात…’, फोटो ट्विट करत रोहित पवारांचे भाजपवर टीकास्त्र
- Maharashtra Political News | ‘उद्धव ठाकरेंना अर्थसंकल्प, सहकार, शेतीतलं काहीच कळत नव्हतं सांगायचे, मग शदर पवारांनी…’, उपमुख्यमंत्र्यांची टोलेबाजी (व्हिडिओ)
- Devendra Fadnavis | पोटदुखीवर औषध देण्याकरता डॉ. एकनाथ शिंदे आणलेत, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला (व्हिडिओ)