Pune Police Crime News | लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार 2 वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime News | कुंजीरवाडी, म्हातोबाची आळंदी, नायगाव फाटा, पुणे सोलापूर रोड (Pune Solapur Road) परिसरात दहशत निर्माण करुन नागरिकांना त्रास देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. योगेश शांताराम लोंढे Yogesh Shantaram Londhe (वय-30 रा. कुंजीरवाडी माळवाडी, ता. हवेली) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. (Pune Police Crime News)

 

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण (Senior PI Dattatraya Chavan) यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार योगेश लोंढे हा लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी त्याच्या साथिदारांच्या मदतीने सतत गुन्हे करत असल्याने त्याच्याविरुद्ध कोणीच तक्रार देण्यास पुढे येत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Pune Police Crime News)

 

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी योगेश लोंढे याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन परिमंडळ पाच चे पोलीस पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांच्याकडे पाठवला. प्रस्तावाची पडताळणी करुन सराईत गुन्हेगार योगेश लोंढे याला पुणे शहर (Pune City) व पिंपरी चिंचवड आयुक्तालय (Pimpri Chinchwad Commissionerate), पुणे जिल्ह्यातून (Pune District) दोन वर्षाकरिता तडीपार (Tadipar) करण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांनी दिले.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण,
पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (PI Subhash Kale), पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे (PSI Kiran Dhaygude), पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदीप घनवटे, भोसले यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Police Crime News | Criminals within Lonikalbhor police station limits banished from the district for 2 years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा