Pune ACB Trap News | पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस अंमलदार अन् मध्यस्थी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap News | पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागानं पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police) अखत्यारितील निगडी पोलिस चौकीत (Nigdi Police Chowki) कार्यरत असणार्‍या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस अंमलदार आणि एका खाजगी मध्यस्थाला लाच घेताना ताब्यात घेतले आहे. (Pune ACB Trap News)

 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक पोलिस निरीक्षक Assistant Police Inspector (API) आणि पोलिस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या (Anti Corruption Bureau Pune) जाळयात सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. निगडी पोलिस स्टेशनच्या (Nigdi Police Station) अंकित असलेल्या निगडी पोलिस चौकीच्या अधिकार्‍यावर हा ट्रॅप झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे (API Amol Prakash Korde), पोलिस अंमलदार सागर तुकाराम शेळके Police Sagar Tukaram Shelke (निगडी पोलिस स्टेशन) आणि खाजगी इसम सुदेश शिवाजी नवले Sudesh Shivaji Navale (43, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक अमोल कोरडे आणि पोलिस अंमलदार सागर शेळके यांनी खाजगी इसम सुदेश नवले याच्याकरवी 1 लाख 50 हजार रूपयाची लाच घेतली आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे.

 

 

Web Title :  Pune ACB Trap News | Assistant Police Inspector, Police Officers and Intermediaries in
the Anti-Corruption Trap of Pimpri-Chinchwad Police Commissionerate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा