MLA Siddharth Shirole | बोपखेल ते खडकी जोडणार्‍या पुलाच्या बांधकामाची आमदार शिरोळे यांनी केली पाहणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  MLA Siddharth Shirole | येथील मुळा नदीवर (Mula River In Pune) पिंपरी चिंचवड महानगरपालिका Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) बोपखेल ते खडकी असा पूल (Bopkhel To Khadki Bridge) बांधत आहे. पुलाच्या बांधकामाची पाहणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) केली आणि लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. (MLA Siddharth Shirole )

 

पूलाची लांबी १ हजार ८६६ मीटर आहे. पुलाचे जवळपास ९० ते ९५ टक्के काम पूर्ण झालेले असून पूल सुरु होण्यासाठी जवळपास ७ ते ८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.

हा पूल सुरु झाल्यानंतर खडकी व बोपखेल भागातील नागरिकांची सोय होईल. काम लवकरात लवकर होण्यासाठी अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करेन, असे आमदार शिरोळे यांनी स्पष्ट केले.

या पाहणीच्या वेळी रवींद्र साळेगावकर, गणेश बगाडे, धर्मेश शहा, तसेच पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

Web Title : MLA Siddharth Shirole | MLA Siddharth Shirole inspected the construction of the bridge connecting Bopkhel to Khadki

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा