Pune Police Crime News | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा झोन पाचमधील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा

255 सराईत गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार आणि हद्दपारीची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime News | पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वर्चस्वाकरिता टोळी युद्ध करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर (Criminal On Pune Police Records) पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी झोन पाच मधील पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार झोन पाच मधील 255 सराईत गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA Action), एमपीडीए (MPDA Action) व हद्दपारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Police Crime News)

झोन पाच मधील पोलीस ठाण्यांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या अभिलेखाचा अभ्यास करुन मोक्का, तडीपारी आणि एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी 2023 ते आजपर्यंत दोन टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीतील 7 तर बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (Bibvewadi Police Station) हद्दीतील 2 गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा (हद्दपार) कलम 55 नुसार हद्दपार करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 23 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत 16 सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यावर कारवाई करुन 88 आरोपींना अटक केली आहे. तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत 12 आरोपींना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायदा (हद्दपार) कलम 55, 56, 57 नुसार 92 आरोपींना पुणे शहर आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. झोन पाच मधील पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या एकूण 255 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटण करण्यासाठी
रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई यापुढे देखील सुरु राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Pune Police Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Ritesh Kumar),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार
वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे (ACP Shahuraje Salve) व हडपसर विभागाचे
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांनी व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व
तपासी पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंची ‘त्या’ मुद्यावरुन व्यापाऱ्यांना इशारा, म्हणाले-‘ नसत्या भानगडीत पडू नका, मनसैनिकांचे लक्ष असेल हे विसरु नका’