पुणे पोलिसांच्या सायकल पेट्रोलिंगचं उद्घाटन मनपा आयुक्त विक्रम कुमार अन् सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याहस्ते

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रथमच आता पुणे पोलीस कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सायकलवरून गस्त घालणार आहेत. येथे असणाऱ्या छोटछोट्या गल्लीत देखील आता या सायकलच्या माध्यमातून पोलीस पोहचणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. समर्थ पोलीस ठाण्यात आजपासून हा प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला आहे.
महत्वाचे : चेक ट्रंकेशन (CTS) सिस्टमवर RBI चे निर्देश, तुमच्यावर होणार थेट परिणाम

समर्थ पोलीस ठाण्याला या अद्यावत अश्या 10 सायकली महापालिकेच्या वतीने सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आल्या. सायकल पेट्रोलिंगचे उद्घाटन महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, 25 वेळा आयर्नमॅन पदक विजेते कौस्तुभ राडकर उपस्थित होते.
यावेळी 60 सीसीटीव्ही बसवणे आणि स्पोर्ट्स ग्राऊंडचे उद्घाटन झाले, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.
हे ही वाचा : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे घेणार मोठा निर्णय, मुंबई पोलिस दलात होणार फेरबदल ?

मध्यवस्तीत छोटछोट्या गल्या आहेत. येथे वाहने घेऊन जाने कठीण असते. अश्यावेळी एखादी मोठी घटना घडल्यानंतर पोलिसांना पोहचणे शक्य होत नाही. किंवा विनाकारण वेळ लागतो. पण आता या परिसरात पोलीस वेळेत पोहचनार आहेत. तसेच त्यामुळे लवकर मदत देखील मिळणार आहे. आता समर्थ पोलीस ठाण्याचे  कर्मचारी गस्त घालताना या सायकलचा वापर करणार आहे. अद्ययावत अश्या या सायकल असून, तिला सात गिअर आहेत. दिवसा व रात्री ठराविक वेळेत हे पोलीस सायकलवरून गस्त घालणार आहेत. गस्तीच्या निमित्ताने प्रत्येक पोलिसांना दररोज काही अंतर सायकल चालवणे बंधन आहे. त्याचा पुणेकरासोबतच पोलिसांना देखील फायदा होणार असून, पोलिसांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होईल.

यावेळी बोलताना आयुक्त विक्रम कुमार यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देत समर्थ पोलीस ठाणे व त्याच्या परिसर स्वच्छ व सुंदर असल्याचे सांगत कौतुक केले. तर पुणेकरांसाठी देखील सायकल प्लान बनविला असल्याचे नमूद केले. तर बिडकर यांनी समर्थ पोलीस ठाणे हा भाग मी राहत असलेल्या परिसरात आहे. त्यांनी केलेली मागणी मी पूर्ण केली असून, यापुढे देखील अद्यावत सुविधांसाठी लागणारी तांत्रिक मदत करण्याचा प्रयत्न राहील.

पोलीस दलात वाहनांची कमतरता आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षात अनेक नागरिकांच्या तक्रारी येतात. या सायकलींचा उपयोग अशा ठिकाणी तत्परतेने जाण्यासाठी करता येईल. पोलीस जेव्हा या सायकल वरून गस्त घालत असतील तेव्हा त्यांना युनिफॉर्ममध्ये पाहून होणारे गुन्हे नक्कीच टळतील. जेथे पोलिस  दुचाकी अथवा जीप घेऊन पोहोचू शकत नाहीत, अशा भागात पोहचतील. तर पर्यावरणाचा समतोल देखील यामुळे राखला जाईल, असे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
Read More…
शिवसेनेचा सामनामधून सवाल; ‘NIA ने उरी, पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यात काय तपास केला ?’
परमबीर सिंह ‘नाराज’; नवीन पदभार न घेताच रजेवर
LIC ची 29 कोटी पॉलिसीधारकांना मोठी भेट ! सुरू केली ‘ही’ नवी सुविधा, ‘पॉलिसी होल्डर्स’ला असा मिळणार फायदा, जाणून घ्या
‘माझ्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याला DGP, मुंबई CP का केलं?; IPS पांडे यांचा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘सवाल’
दिलासादायक ! सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे होणार खिशावरचा भार कमी अन् पैशांचीही बचत
घर बसल्या 10 हजार लावून सुरु करा ‘हा’ बिझनेस; दर महिन्याला होईल 30 हजारांची कमाई