Pune Police MCOCA Action | हॉटेल व्यवसायिकाला महारहाण करुन खंडणी मागणाऱ्या अखिल उर्फ ब्रिटिश पालांडे टोळीवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 63 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Pune Police MCOCA Action | MCOCA on Pravin Yenpure gang spreading terror in Katraj area! MCOCA on 113 organized crime gangs so far by Commissioner of Police Ritesh Kumar

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | खंडणी (Extortion Case) देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल व्यसायिकाला मारहाण (Beating) करुन हॉटेलची तोडफोड करणाऱ्या तसेच गळ्यातील सोन्याची चैन (Chain Snatching) जबरदस्तीने हिसकवून नेणाऱ्या येरवडा परिसरातील अखिल उर्फ ब्रिटिश अनिल पालांडे (Akhil Alias British Anil Palande) याच्यासह इतर 2 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 63 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये (Pune Police MCOCA Action) कारवाई केली आहे.

विमाननगर येथील हॉटेल व्यवसायिकाकडे प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये मागणी केली. व्यवसायिकाने खंडणी (Ransom) देण्यास नकार दिला असता आरोपींनी फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये येऊन मी इथला मोठा गुंड असल्याचे सांगत हॉटेलची तोडफोड करण्याची धमकी दिली. हॉटेल चालवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे म्हणत फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने घेऊन हॉटेलची तोडफोड केली. हा प्रकार विमाननगर येथे 6 सप्टेंबर रोजी घडला होता. याप्रकरणी टोळी प्रमुख अखिल उर्फ ब्रिटिश अनिल पालांडे (वय-27 रा. धानोरीगाव, विश्रांतवाडी), ओंकार शिवाजी टिंगरे Omkar Shivaji Tingre (वय-22 रा. संगमवाडी), आयुष जाधव (अंदाजे वय-25) यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) आयपीसी 394, 385, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन टोळी प्रमुख अखिल उर्फ ब्रिटिश पालांडे याला अटक केली आहे.

आरोपी पालांडे याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन स्वत:च्या व टोळीच्या वर्चस्वासाठी गुन्हे केले आहेत. यामध्ये घातक हत्यारांनी दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, नुकसान करणे, खंडणी मागणे, शस्त्र बाळगणे, धारदार हत्याराने हल्ला करणे, परिसरात दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत. (Pune Police MCOCA Action)

येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior PI Balkrishna Kadam) यांनी परिमंडळ- 4 पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे,
सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम,
पोलीस निरीक्षक गुन्हे कांचन जाधव (PI Kanchan Jadhav), जयदिप गायकवाड,
सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे (API Mahesh Lamkhede), पोलीस उपनिरीक्षक रविंद्र वारंगुळे (PSI Ravindra Warangule), सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार सचिन माळी, सचिन शिंदे, प्रकाश चौधरी, देविदास वांढरे यांच्या पथकाने केली.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध
गुन्हे करणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार यासारख्या कारवाया
केल्या आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया केल्या जणार आहेत. पोलीस आयुक्तांनी आज पर्यंत पुणे शहरातील
63 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कलयुग ! सख्या भावाने अत्याचार करुन 14 वर्षाच्या बहिणीला केले गर्भवती; मुलीने दिला बाळाला जन्म

Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू, डॉक्टरवर FIR

Total
0
Shares
Related Posts
Khadki Pune Crime News | Beat the driver and took the cab away! Two rickshaws, a car and a pedestrian were hit on the way

Pune Crime News | पुणे : धर्मांतराचा कट? ब्लेसिंग ऑईल, प्रभूची गाणी आणि डान्स करुन बरे होत असल्याचे सांगणाऱ्या पास्टर व सिस्टरवर जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | Pimpri Municipal Corporation owes Rs 7 crore 55 lakh to the police; The topic of discussion in the city; Property on Lease for Police Station, Chowki with Commissionerate

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | पिंपरी महापालिकेची पोलिसांकडे 7 कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी; शहरात ठरतोय चर्चेचा विषय; आयुक्तालयासह पोलीस ठाणे, चौकीसाठी मालमत्ता भाडेतत्वावर